पाकमध्ये दरवर्षी तब्बल एवढ्या मुलींचे होते धर्मांतर

Conversion-of-girls
Conversion-of-girls

कराची - चर्चमधील प्रार्थना नेहाला खूप आवडत असत. मात्र, अवघ्या १४ व्या वर्षी तिला आपला ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाममध्ये सक्तीने धर्मांतर करावे लागले. आपल्या वयाच्या दुप्पट वयाच्या मुली असणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीशी जबरदरस्तीने विवाह करावा लागला. आता अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी तिचा पती तुरुंगात आहे. धर्मांतर केल्याबद्दल तिचा भाऊ तिच्या हत्येच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे ती जीव मुठीत घेऊन फिरते. पाकिस्तानात नेहाप्रमाणेच अल्पसंख्यांक समुदायातील एक हजार मुलींचे दरवर्षी सक्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात येते.

मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते, कोरोनामधील लॉकडाउनमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सामान्यतः परिचयातील किंवा वधू शोधणाऱ्या व्यक्तीकडून अपहरण होते. काहीवेळा कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी जमीनदारही त्यांना ताब्यात घेतात. एकदा धर्मांतर झाले की या मुलींचा वृद्ध व्यक्तीशी किंवा अपहरणकर्त्याशी विवाह लावला जातो, असा पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोगाचा दावा आहे. या सर्वांना मौलवी, पोलीस, दंडाधिकाऱ्यांची साथ मिळत असल्याची पुष्टी बालहक्क कार्यकर्ते जोडतात. इस्लाममध्ये धर्मांतरापेक्षाही कुमारी वधू मिळविण्याचे लक्ष्य असते. पाकिस्तानातील २२ कोटी लोकसंख्येतील अल्पसंख्यांक साडेतीन टक्के लोकांना नेहमीच भेदभावाचा सामना करावा लागतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेकडूनही दखल
अमेरिकेनेही नुकतेच या महिन्यात पाकिस्तानला धार्मिक स्वातंत्र्याचा उल्लंघन होणारा देश म्हणून घोषित केले होते. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने हिंदू, ख्रिश्चन, शीख आदी अल्पसंख्यांक धर्मांतील मुलींचे सक्तीने अपहरण करून इस्लाममध्ये धर्मांतर केले जात असल्याचा अहवाल दिला होता. बहुतेक मुली पाकिस्तानातील दक्षिण सिंध प्रांतातील हिंदू धर्मीय आहेत. मात्र, नुकत्याच काही महिन्यांत नेहासह दोन ख्रिश्चनधर्मीय मुलींचेही धर्मांतर करण्यात आले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com