कुलभूषण यांना अटक इराणमधून; पाक अधिकाऱ्याचा खुलासा

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

लेफ्टनंट जनरल अहमद शोएब म्हणाले, की कुलभूषण यांना पाकिस्तानमध्ये नाही तर इराणमधून अटक करण्यात आली. नंतर त्यांची अटक बलुचिस्तानमधून करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. 

इस्लमाबाद - भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना इराणमधूनच अटक करण्यात आल्याची माहिती खुद्द आयएसआयचे माजी अधिकारी आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल अमजद शोएब यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून बलुचिस्तान येथून अटक केल्याचा दावा केला आहे. मात्र, भारताने सतत त्यांना इराणमधून ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. आता पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याच्या वक्तव्यामुळे भारताच्या या दाव्यास आणखी बळ मिळाले आहे. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. भारताने या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धावा घेतली. या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांच्या फाशीवर स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आहे. कुलभूषण हे सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.

लेफ्टनंट जनरल अहमद शोएब म्हणाले, की कुलभूषण यांना पाकिस्तानमध्ये नाही तर इराणमधून अटक करण्यात आली. नंतर त्यांची अटक बलुचिस्तानमधून करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. शोएब यांनी हे वक्तव्य भारतासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागताना खूप उपयोगी येणार आहे. पाकिस्तानने या प्रकरणाची अंतिम सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Ex-ISI official admits Kulbhushan Jadhav was captured from Iran