मार्क झुकेरबर्ग पुन्हा दोन महिन्यांची सुटी घेतोय; कारण…

वृत्तसंस्था
रविवार, 20 ऑगस्ट 2017

झुकेरबर्गने शुक्रवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती सर्वांना दिली. याआधी देखील झुकेरबर्गने त्याची पहिली मुलगी मॅक्सचा जन्म तेव्हा दोन महिन्यांची पितृत्व रजा घेतली होती. आता पुन्हा तो दोन महिन्यांच्या रजेवर जाणार आहे.

कॅलिफॉर्निया: सोशल नेटवर्किंगचा बादशाह असलेला फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी पुन्हा एकदा नवीन पाहूण्याचे आगमन होणार आहे. म्हणजेच मार्क झुकेरबर्गच्या घरी पुन्हा  पाळणा हलणार असून त्याच्या घरी पुन्हा एका परीचे आगमन होणार आहे. यासाठी झुकेरबर्गने पुन्हा पितृत्व रजेसाठी अर्ज केला आहे.

झुकेरबर्गने शुक्रवारी रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती सर्वांना दिली. याआधी देखील झुकेरबर्गने त्याची पहिली मुलगी मॅक्सचा जन्म तेव्हा दोन महिन्यांची पितृत्व रजा घेतली होती. आता पुन्हा तो दोन महिन्यांच्या रजेवर जाणार आहे.

“मी प्रिसिलासोबत आरंभीच्या काही महिन्यांमध्ये तिच्यासोबत राहू शकलो, तर ते चांगले होईल. आमची दुसरी मुलगी आता लवकरच जन्म घेणार आहे. मी पुन्हा दोन महिन्यांच्या रजेसाठी अर्ज केला आहे,” असे झुकेरबर्गने म्हटले आहे. पत्नी प्रिसिला आणि मुलींसोबत राहण्यासाठी एक महिन्याची रजा घेणार असून त्यानंतर डिसेंबर महिन्यातही त्यांच्यासोबत राहण्यासाठी रजा घेणार असल्याचे झुकेरबर्गने सांगितले..

“फेसबुकमध्ये आम्ही चार महिन्यांची मातृत्व आणि पितृत्व रजा उपलब्ध करून देतो. शिवाय केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, नोकरी करणारे कुटुंबीय नवीन जन्मलेल्या बालकांसोबत राहतात, तेव्हा संपूर्ण कुटुंबासाठी ते चांगले असते. मी जेव्हा परत कामावर येईन तेव्हा संपूर्ण ऑफिस माझ्यासोबत असेल, अशी मला आशा आहे,” असे त्याने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.

Web Title: Facebook CEO Mark Zuckerberg will take two months of paternity leave this year