निवडणुकांपूर्वी दहशतवादी हाफिज सईदला 'सोशल' झटका

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

मिली मुस्लिम लीग नावाचा राजकीय पक्ष स्थापन करून पाकिस्तानमध्ये निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवादी हाफिज सईदला फेसबुकने जोरदार झटका दिला आहे. फेसबुकने हाफिज सईदच्या पक्षाचं फेसबुक पेज डिलिट केलं आहे. त्याचबरोबर, हाफिजच्या पक्षाच्या उमेदवारांचेही फेसबुक पेज डिलिट करण्यात आले आहेत.

इस्लामाबाद- मिली मुस्लिम लीग नावाचा राजकीय पक्ष स्थापन करून पाकिस्तानमध्ये निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवादी हाफिज सईदला फेसबुकने जोरदार झटका दिला आहे. फेसबुकने हाफिज सईदच्या पक्षाचं फेसबुक पेज डिलिट केलं आहे. त्याचबरोबर, हाफिजच्या पक्षाच्या उमेदवारांचेही फेसबुक पेज डिलिट करण्यात आले आहेत.

फेसबुकच्या या कृतीमुळे मिली मुस्लिम लीगचे धाबे दणाणले असून 'फेसबुकने त्यांच्या धोरणांचं उल्लंघन केलं आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन असून आमच्यावर फेसबुकने अन्याय केलाय,' असे मिली मुस्लिम लीगकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी निवडणुका होत असल्याने फेसबुकनेही त्यापार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानमधील कोणत्याही दहशतवादी गटाने फेसबुकचा दुरुपयोग करू नये म्हणून हे निर्णय घेण्यात आल्याचे फेसबुककडून सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, आणि त्या पार्श्वभूमीवर फेसबुकने घेतलेला हा निर्णय हाफिजसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook deletes hafiz saeeds mml pages