फेसबुकने ट्रम्प यांच्या प्रचाराची जाहिरात अखेर वगळली; कारण वाचा

Facebook-and-Donald-Trump
Facebook-and-Donald-Trump
Updated on

वॉशिंग्टन - अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्या प्रचाराची जाहिरात आज सोशल मीडिया कंपनी फेसबुकने वगळली आहे. या जाहिरातीत लाल रंगाच्या उलट्या त्रिकोणाचा वापर केला होता. या चिन्हाचा वापर नाझीकर्त्यांनी तत्कालीन काळात राजकीय कैदी, डाव्या विचारसरणीचे आणि तुरुंगात असलेल्या कैद्यांसाठी केला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेसबुकचे प्रवक्ते ॲडी स्टोन यांनी म्हटले की, फेसबुक कंपनी सांघिक द्वेषभावनेच्या विरोधात असून, त्याचे उल्लंघन केले जात असल्याने वादग्रस्त पोस्ट आणि जाहिराती काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ही जाहिरात बुधवारी प्रसिद्ध झाली होती. 

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वादग्रस्त जाहिरात काढून न टाकल्याने फेसबुकवर टीका केली जात होती. शेवटी या टीकेची दखल घेत कंपनीचे मार्क झुकेरबर्ग यांनी कारवाई केली.

याशिवाय नागरी अधिकार कार्यकर्ते, डेमोक्रॅटिक नेते आणि कंपनीतीलच कर्मचाऱ्यांकडूनही वादग्रस्त पोस्ट आणि जाहिरात काढून टाकण्याची मागणी केली जात होती. ही जाहिरात अध्यक्ष ट्रम्प आणि उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्या पेज आणि साइटवर पोस्ट केली होती. ट्रम्प यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे टीम मूर्तो म्हणाले की, लाल रंगाच्या त्रिकोणाचा वापर हा ‘अँटिफा’साठी केला होता. अँटिफाचा वापर हा डावे विचारसरणी बाळगणाऱ्या लोकांसाठी केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com