भारत-चीनमध्ये युद्ध झाल्यास कोण वरचढ ठरेल? जाणून घ्या दोन्ही देशांकडील शस्त्रास्त्रांची संख्या...

india, china, ladakh, america
india, china, ladakh, america
Updated on

नवी दिल्ली- पूर्व लडाखमधील गालवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला. यात भारताचे 20 जवान शहीद झाले, तर चीनचे 43 सैनिक मारले गेल्याची माहिती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कोणते राष्ट्र वरचढ ठरेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. तसेच कोणत्या देशाकडे किती आणि कशाप्रकारची शस्त्रास्त्रे आहेत याबाबत अभ्यास सुरु झाला आहे. चीन हा कायदावर शक्तीशाली देश वाटू शकतो. मात्र, युद्धाच्या मैदानात लढण्याचा भारतीय जवानांना जास्त अनुभव आहे. 2019 च्या युद्ध मशीन आकडेवारीनुसार, चीन हा भारतापेक्षा प्रत्येक गोष्टींमध्ये भारतापेक्षा वरचढ आहे. केवळ भारताची सैन्य संख्या ही चीनपेक्षा अधिक आहे. भारत आणि चीनमध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांनी तुलना आपण सविस्तरपणे करुया...

भारताचे एकूण सैन्यदल  जवळपास 34 लाख आहे. यात लष्कर, वायुदल आणि नौदलाचा समावेश होतो. तर चीनकडे जवळपास 27 लाख सैन्यदल आहे. चीनचे सैन्यदल अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज आहे. भारत आपल्या लष्करावर 71 अब्ज डॉलर खर्च करतो. तर चीन भारतापेक्षा जवळजवळ साडेतीन पट अधिक लष्करावर खर्च करतो. चीन वर्षाला 291 अब्ज डॉलर आपल्या सैन्यावर खर्च करतो. आण्विक शस्त्रास्त्रांमध्येही भारत चीनपेक्षा खूप मागे आहे. चीनकडे 320 आण्विक अस्त्रे आहेत. तर भारताकडे 150 आण्विक अस्त्रे आहेत. भारताकडे सध्या 692 लष्करी हेलिकॉप्टर आहेत. तर चीनकडे 1004 लष्करी हेलिकॉप्टर आहेत. रणगाड्यांच्या बाबतीत चीन भारतापेक्षा खूप पुढे आहे. चीनकडे एकूण 13,050 रणगाडे आहेत, तर भारताकडे 4,187 रणगाडे आहेत. शस्त्रसज्ज वाहने भारताकडे 2815 आहेत, तर चीनकडे ते तब्बल 40 हजारांपेक्षाही अधिक आहेत. भारताकडे फायटर विमानांची संख्या 520 आहे, तर चीनकडे एकूण 1,222 फायटर विमाने आहेत. शिवाय भारताकडे 694 अॅटक एअरक्राफ्ट आहेत, तर चीनकडे 1,564 एअरक्राफ्ट आहेत.

भारत आणि चीन या दोन्ही देशांना विस्तिर्ण समुद्र किनारा लाभला आहे. शिवाय चीनची हिंद महासागरात वर्चस्व गाजवण्यासाची मनिषा लपून राहिलेली नाही. समुद्रभागात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी चीनने चांगली तयारी केली आहे. चीनकडे एकूण 76 पाणबुड्या आहेत, तर भारताकडे 16 पाणबुड्या आहेत. टेहळणीसाठी या पाणबुड्यांचा वापर महत्वाचा ठरतो. शिवाय चीनकडे 714 युद्धनौका आहेत, तर भारताकडे 295 युद्धनौका आहेत. शस्त्रांस्त्रांची संख्या लक्षात घेता चीन आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे. तसेच 1962 च्या लढाईत चीनने आपल्याला मात दिली आहे. असे असले तरी चीनने 1979 साली  व्हिएतनामसोबत शेवटचे युद्ध लढले होते. तेव्हापासून चीनला मैदानी युद्धाचा जास्त अनुभव नाही. तर भारताला मैदानी युद्धाचा दिर्घ अनुभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com