esakal | लोकांचा जीव वाचवण्यात फेसबुक सहाय्यक; बायडेन यांना कंपनीचा रिप्लाय
sakal

बोलून बातमी शोधा

biden

चुकीची माहिती प्रसारित करण्याच्या बायडेन यांच्या आरोपांचे खंडन फेसबुकने केले आहे. फेसबुक’चे प्रवक्ते डॅनी लिव्हर म्हणाले की, तथ्यहिन आरोपांमुळे आम्ही विचलीत होणार नाही.

लोकांचा जीव वाचवण्यात फेसबुक सहाय्यक; बायडेन यांना कंपनीचा रिप्लाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - ‘‘कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशींबद्दल चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास सोशल मीडिया कंपन्यांना अपयश आले असून त्या लोकांच्या मारेकरी ठरत आहेत,’’ अशी कठोर टीका अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी केली. लशींबद्दल चुकीचा माहिती देणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे अमेरिकेचे सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी गुरुवारी केले होते.

कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू आणि गंभीर आजारी पडणे या पासून लशींमुळे बचाव होऊ शकतो, असा सल्ला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. त्याच्यानंतर काल लगेचच बायडेन यांनी सोशल मीडियाला दोषी ठरवले. कोरोनाच्या लशींबद्दल संभ्रम करणारी व चुकीची माहिती पसरविली जात आहे, अशा फेसबुकसारख्या सोशल मीडिया व्यासपीठांना काय संदेश द्याल, असे पत्रकारांनी बायडेन यांना विचारले होते. बायडेन म्हणाले की, ते लोकांचा जीव घेत आहेत. आमच्याकडे ज्यांनी लसीकरण केले नाही, त्यांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: पाकिस्तानात साखर, तूप महाग; पेट्रोल 118 रुपयांवर

आरोपांमुळे विचलीत होणार नाही - फेसबुक

चुकीची माहिती प्रसारित करण्याच्या बायडेन यांच्या आरोपांचे खंडन फेसबुकने केले आहे. फेसबुक’चे प्रवक्ते डॅनी लिव्हर म्हणाले की, तथ्यहिन आरोपांमुळे आम्ही विचलीत होणार नाही. सत्य हे आहे की, फेसबुकवर दोन अब्ज लोकांनी कोरोनासंबंधी आणि लसीकरणाबद्दल अधिकृत माहिती पाहिली आहे. इंटरनेटवरील अन्य कोणत्याही ठिकाणच्या माहितीपेक्षा ही माहिती प्रामाणिक आहे. लस कोठे व कशी घ्यायची याची माहिती आमच्या व्यासपीठावरून ३३ लाख अमेरिकी नागरिकांनी घेतली. जीव वाचविण्यासाठी ‘फेसबुक’ सहाय्यक ठरत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून ज्याला एखाद्या समस्येवर माहितीचा भडिमार, असे समजले जाते, जी कोरोनासंबंधी चुकीची माहिती प्राणघातक ठरु शकते, असे मूर्ती यांनी म्हटले आहे. अशी चुकीची माहिती आपल्या देशातील आरोग्यासाठी स्पष्ट व विश्‍वासघाती धोका आहे. एक राष्ट्र म्हणून चुकीच्या माहितीचा सामना आपल्याला करायला हवा. आपले जीवन त्यावर आधारलेले आहे, असे मूर्ती म्हणाले. आरोग्याविषयी चुकीच्या माहितीचा फैलाव करण्यात इंटरनेटच्या भूमिकेचा उल्लेख करीत मूर्ती म्हणाले की, तंत्रज्ञान कंपन्या आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठांनी चुकीची माहिती देण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या उत्पादनांत अथवा सॉफ्टवेअरमध्ये योग्य बदल करणे आवश्‍यक आहे, अशी सूचनाही मूर्ती यांनी केली होती.

loading image