esakal | पाकिस्तानात साखर, तूप महाग; पेट्रोल 118 रुपयांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan

पाकिस्तानमध्ये साखरेचा दर आता एक किलोला 68 रुपयांवरून 85 रुपये इतका झाला आहे.

पाकिस्तानात साखर, तूप महाग; पेट्रोल 118 रुपयांवर

sakal_logo
By
सूरज यादव

इस्लामाबाद - पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळत चालली असून आता यावर उपाय म्हणून पेट्रोलशिवाय अन्न धान्याच्या किंमतीतही वाढ केली आहे. यामध्ये गहू, साखर, तूप यांचेही दर वाढवले आहेत. मंत्रिमंडळाच्या समितीने शुक्रवारी पाकिस्तानच्या युटिलिटी स्टोअर्स कार्पोरेशनमध्ये साखर, गहू, तूप यांच्या दरांमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली.

पाकिस्तानमध्ये साखरेचा दर आता एक किलोला 68 रुपयांवरून 85 रुपये इतका झाला आहे. तर तूप 170 रुपयांवरून 260 रुपये प्रति किलो इतके झाले आहे. तर 20 किलो गव्हाची बॅग 850 रुपयांवरून 950 रुपये इतकी झाली आहे. युटिलिटी स्टोअर्स कार्पोरेशनकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाची किंमती आणि बाजारातील किंमती यामध्ये अंतर वाढलं आहे.

युटिलिटी स्टोअर्स कार्पोरेशनकडून देणाऱ्या येणाऱ्या अनुदानात समतोल साधण्यासाठी तीन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवण्यास मंजुरी दिली गेली. अर्थमंत्री शौकत तारिन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बैठकीत 2 लाख टन साखरेच्या आयातीला मंजुरी दिली.

हेही वाचा: भारतीय नौदलाला अमेरिकेकडून मिळाली MH-60R 'रोमियो' हेलिकॉप्टर

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवण्याचा निर्णय़ हा इंधन दरात मोठ्या वाढीची घोषणा केल्यानंतर घेण्यात आला आहे. आधीच महागाईचा फटका बसलेल्या पाकिस्तानी जनतेला या निर्णय़ाने मोठा दणका बसला आहे. सध्या पाकिस्तानात पेट्रोलचे दर 118.09 रुपये प्रति लिटर इतके आहेत. तर डिझेलची किंमत 116.5 रुपये प्रति लिटर आहे. इंधन दर वाढवण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता असं माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितंल .

2020 मध्ये पाकिस्तानात गरीबी 4.4 टक्क्यांवरून 5.4 टक्के इतकी वाढल्याचा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला होता. तसंच 2021-22 या वर्षात गरीबीचे प्रमाण 39.2 टक्के राहील असाही अंदाज वर्तवला होता.

loading image