
डोनाल्ड ट्रम्प यांना 2023 पर्यंत फेसबुकवर 'नो एन्ट्री'
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं फेसबुक (Facebook) खातं दोन वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आलं आहे. याचाच अर्थ या कालावधीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांना कोणतीच पोस्ट करता येणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना किमान 2023 पर्यंत फेसबुक वापरता येणार नाही. यूएस कॅपिटलमध्ये (संसद) जानेवारी 2021 झालेल्या हिंसाचारात ट्रम्प यांचा सहभाग दिसून आल्यानंतर फेसबुकनं हा निर्णय घेतला आहे. ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटनेही ट्रम्प यांचे अकाऊंट काही कालावधीसाठी बंद केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना दिलेल्या मेसेजमुळेच हिंसाचार उफाळला असल्याचा आरोप आहे.
सहा जानेवारी 2021 रोजी कॅपिटॉल येथे झालेल्या भीषण दंगलीत लोकांना हिंसाचारासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल ट्रम्प यांचे फेसबुक खाते चार महिन्यांपूर्वी तात्पुरते बंद करण्यात आले होते. शुक्रवारी फेसबुकच्या ‘ओव्हरसाइट बोर्डाच्या’ बैठकीत ट्रम्प (Donald Trump) यांचं खातं आणखी काही दिवस बंद (suspend) ठेवण्याचा निर्णय मतदानाअंती कायम ठेवला.
20 जानेवारी 2021 पासून डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कार्यरत दिसले नाहीत. किंवा सार्वजनीक कार्यक्रमातही दिसले नाहीत. मात्र, आता त्यांनी व्यक्त होण्यासाठी नवीन मार्ग अवलंबला आहे. आपलं मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी नवीन वेबसाइट काढत शक्कल लढवली आहे. ट्रम्प यांचे समर्थक त्यांचं मतं फेसबुक किंवा ट्विटरवर पोस्ट करु शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांची एक वेसबाईट आहे. यामध्ये From the Desk of Donald J. Trump असं वेगळं सेक्शन तयार करण्यात आलं आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प कार्यकर्त्यांसाठी आपलं मत व्यक्त करतील.