ट्रम्प यांना फेसबुक-ट्विटरचा दणका; कोरोनाला हलक्यात घेण्याची केली चूक

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 October 2020

कोरोनाशी लढा देत असलेले अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुक आणि ट्विटरने दणका दिला आहे.

वॉशिंग्टन- कोरोनाशी लढा देत असलेले अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुक आणि ट्विटरने दणका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी लष्करी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यादरम्यान त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवर कोरोनासंबंधी काही पोस्ट केल्या होत्या. यात ते म्हणाले होते की, कोरोना विषाणूबाबत भिती बाळगण्याची गरज नाही. कारण कोरोना हा साध्या फ्लू (ताप) सारखा आहे. 

ट्रम्प यांच्या या पोस्टवर फेसबुक आणि ट्विटरकडून कारवाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणूसंबंधात ट्रम्प यांनी केलेल्या पोस्ट दिशाभूल करणाऱ्या आहेत, असं कंपनीने म्हटलं आहे. फेसबुक आणि ट्विटरकडून या पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र, याआधी या पोस्ट 26,000 वेळा शेअर झाल्या आहेत. 

दिलासादायक! देशातील कोरोनाचा प्रभाव होतोय कमी

राजकीय नेत्यांच्या पोस्टबाबत पक्षपाती भूमिका घेण्याचा आरोप फेसबुकवर अनेकदा झाला आहे. शिवाय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातही फेलबुकने क्वचितच कारवाई केली आहे. मात्र, कोरोना संबंधी चुकीची माहिती पसरवल्यामुळे फेसबुकने त्यांच्यावर कारवाई केली. ट्विटरनेही ट्रम्प यांनी मंगळवारी केलेल्या पोस्ट काढून टाकल्या आहेत. ट्रम्प यांच्या पोस्ट नियमभंग करणाऱ्या आहेत. त्यांनी कोरोना संबंधी दिशाभूल करणारी आणि मोठ्या प्रमाणात नुकसाईकारक ठरणारी माहिती शेअर केली आहे, असं ट्विटर प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. 

लष्करी रुग्णालयात तीन दिवस काढल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट केल्या होत्या. कोरोनाला घाबरण्याचे काही कारण नाही. कोरोनाला तुमचा ताबा घेऊ देऊ नका. ट्रम्प प्रशासनामध्ये तुम्ही सुरक्षित आहात, असं ते म्हणाले होते. ट्रम्प यांच्या वक्तव्याचे त्यांच्या प्रवक्त्याने समर्थन केले आहे. कोरोना विषाणूशी ट्रम्प लढा देत आहेत, अशावेळी काही माध्यमे विनाकारण त्यांच्यावर चिखलफेक करत आहे, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, फेसबुकने याआधी ऑगस्टमध्ये ट्रम्प यांची फेसबुक पोस्ट काढली होती. लहान मुले कोरोना विषाणूला इम्युन असतात, असं ट्रम्प पोस्टमध्ये म्हणाले होते. 

अग्रलेख : बिहार में एक ‘चिराग’!

अमेरिकेतील 2019-20 च्या फ्लूच्या साथीत influenza 22 हजार जणांचा मृत्यू झाला होता, तर 2020 मध्ये सुरु झालेल्या कोरोना महामारीने एकट्या अमेरिकेत 2 लाख 10 हजारांपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे या दोन्ही आजारांची तुलना करणे योग्य ठरणार नाही. शिवाय अमेरिका कोरोनाने सर्वाधिक प्रभावित राष्ट्र ठरला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Twitter Take Action Over Trump Misleading COVID Posts