esakal | फहीम दाश्तीचा मृत्यू, सालेह यांच्या घरावर हेलिकॉप्टरमधून हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

फहीम दाश्ती

फहीम दाश्तीचा मृत्यू, सालेह यांच्या घरावर हेलिकॉप्टरमधून हल्ला

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: पंजशीर खोऱ्यात (panjshir valley) तालिबानशी (Taliban) दोन हात करताना रविवारी फहीम दाश्ती (Fahim Dashti) यांचा मृत्यू झाला. ते अहमद मसूद नेतृत्व करत असलेल्या नॅशनल रेसिस्टन्स फोर्सचे (NRFA) प्रवक्ते होते. "आम्ही आमचे दोन बंधु, सहकारी आणि फायटर्सना गमावलं. त्याचं आम्हाला दु:ख आहे. दोघे शहीद झाले आहेत" असे, नॅशनल रेसिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे. फहीम दाश्ती आणि हे आमीर साहेब अहमद मसूद यांच्या कार्यालयाचे प्रमुख होते.

जनरल साहीब अब्दुल वादूद यांचाही मृत्यू झाला आहे. साहीब अब्दुल वादूद अहमद मसूदचा भाचा होता. पंजशीरमधली रेसिस्टन्स फोर्सची तालिबान विरोधातील लढाई फक्त प्रांतासाठी नाहीय, तर ती अफगाणिस्तानसाठी आहे, असे फहीम दाश्ती यांनी मागच्या महिन्यात म्हटले होते.

हेही वाचा: पंजशीरमध्ये पाकिस्तानी Air Force कडून बॉम्बफेक

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्या घरावर हेलिकॉप्टरमधून हल्ला झाल्यानंतर त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याच वृत्त सामा न्यूजने दिलं आहे. अमरुल्लाह सालेह पंजशीरमध्ये आहेत. त्यांनी तिथूनच तालिबान विरोधात लढाईची घोषणा केली होती.

हेही वाचा: हृदयविकार आणि कोरोना टाळायचाय? दहा आयुर्वेदिक उपाय करा ट्राय

पंजशीरमध्ये बॉम्बफेक

पंजशीर (panjshir) तालिबानला (Taliban) जिंकता यावे, यासाठी पाकिस्तान (pakistan) त्यांना मदत करत असल्याचे वृत्त आहे. पंजशीरमध्ये पाकिस्तानी एअर फोर्सच्या ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. ड्रोन्समधून पंजशीरमध्ये बॉम्बफेक करण्यात आली आहे. पंजशीरमध्ये स्मार्ट बॉम्बने हल्ला करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. पंजशीरमध्ये पाकिस्तान तालिबानला फक्त हवाई मदतच करत नाहीय, तर रेसिस्टन्स फोर्सशी लढण्यासाठी काही स्पेशल फोर्सेसही एअर ड्रॉप करण्यात आल्या आहेत, सीएनएन न्यूज १८ ने हे वृत्त दिलेय.

loading image
go to top