पठ्ठ्याचा नादच खुळा! पिकवला 1 हजार किलोचा एकच भोपळा

Todd and Donna Skinner
Todd and Donna Skinneresakal
Summary

आपण सर्वच जण भोपळा खातो आणि बहुतेक लोकांनी भोपळा पाहिलाही असेल.

अमेरिका : आपण सर्वच जण भोपळा खातो आणि बहुतेक लोकांनी भोपळा पाहिलाही असेल. भोपळा सहसा एक किंवा 2 किलो आणि जास्तीत जास्त 3 किलोचा असतो. पण, तुम्ही कधी 10 क्विंटल भोपळ्याबद्दल ऐकलंय? तुम्ही विचार करत आहात, भोपळा तोही 10 क्विंटलचा. होय, तुम्ही बरोबर ऐकलं! वास्तविक, एका शेतकऱ्यानं असंच काहीतरी केलंय. या अमेरिकन शेतकऱ्याचा भोपळा, ज्याचं वजन दहा क्विंटल असल्याचं आढळून आलंय. या भोपळ्यानं एक विश्वविक्रम देखील केलाय. सध्या या भोपळ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

ही गोष्ट आहे, अमेरिकेच्या (America) ओहयोची! अहवालानुसार, दोन शेतकऱ्यांनी मिळून हा भोपळा (Pumpkin) पिकवलाय. ज्यांची नावं टॉड आणि डोना स्किनर (Todd and Donna Skinner) आहेत. या दोघा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जगातील सर्वात मोठा भोपळा पिकवून जागतिक विक्रम (World Record) देखील केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही गेल्या 30 वर्षांपासून भोपळ्याची लागवड करत आहेत. त्यांना त्यांच्या शेतात सर्वात मोठे भोपळे पिकवण्याची आवड आहे आणि त्यांची ही मेहनत फळाला आली असून त्यांची इच्छाही पूर्ण झालीय.

Todd and Donna Skinner
जगात तयार झाली तळहातावर मावेल एवढी बंदूक
Pumpkin
Pumpkin

या दोघांनी मिळून 2164 पौंड म्हणजेच, सुमारे 1000 किलोचा सर्वात मोठा हिरवा भोपळा पिकवलाय. डबलिनमध्ये सुरू असलेल्या भाजीपाला स्पर्धेत त्यांनी भाग घेत आपला भोपळा लोकांसमोर ठेवला, तेव्हा एक विश्वविक्रम झाला. शेतकऱ्यांनी सांगितलं, की आम्हाला भोपळ्याच्या वजनाची कल्पना आधीच आली होती. तर दुसरीकडं ऑकलॅंड नर्सरीनंही याची पुष्टी केली होती. त्यामुळं डोना आणि टॉड आता जगातील सर्वात मोठे भोपळ्याचे उत्पादक बनले आहेत. या भोपळ्याचं वजन 2164 पौंड असल्याचं आढळून आलंय.

Todd and Donna Skinner
महिंद्रानी शेअर केलेल्या VIDEO वर नेटकऱ्यांनी शिकवले Traffic Rules

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com