जगात तयार झाली तळहातावर मावेल एवढी बंदूक

Swiss Mini Gun
Swiss Mini Gunesakal
Updated on
Summary

बंदुकीतून सुटलेली गोळी कोणाचाही जीव घेऊ शकते. हे शस्त्र जितकं महाग, तितकंच धोकादायक देखील आहे.

बर्न : बंदुकीतून सुटलेली गोळी कोणाचाही जीव घेऊ शकते. हे शस्त्र जितकं महाग, तितकंच धोकादायक देखील आहे. जगात बंदुकीच्या किंमती ह्या लाखात पहायला मिळतात. आता जगातील सर्वात छोटी बंदूक नुकतीच समोर आलीय. 'स्विस मिनी गन' (Swiss Mini Gun) या नावानं ओळखली जाणारी ही बंदूक जगातील सर्वात छोटी बंदूक असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.

स्विस मिनी गन (C1ST) ही जगातील सर्वात छोटी बंदूक आहे. ही बंदूक 5.5 सेंटीमीटर लांब, 3.5 सेंटीमीटर रुंद आणि 1 सेंटीमीटर जाडीची असून बंदुकीचं वजन फक्त 19.8 ग्रॅम आहे. ही बंदूक तुमच्या तळहाताच्या एका कोपऱ्यात मावेल एवढी छोटी आहे. परंतु, या बंदुकीची किंमत फारच मोठी आहे. अशी एक बंदूक घेण्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये मोजावे लागतील. या बंदुकीसोबतच एक स्टायलिश लेदर होल्डर मोफत दिलं जातंय. शिवाय, 24 लाईव्ह आणि 24 ब्लॅक कार्टेजेस देखील देण्यात येताहेत. बंदुकीच्या रिंगच्या मदतीनं बेल्टला लटकावण्याची सोय देखील यात उपलब्ध आहे. या बंदुकीसाठी घड्याळ आणि ज्वेलरी तयार करण्यासाठीच्या तंत्राचा वापर करण्यात आलाय.

Swiss Mini Gun
Video : धबधब्यात अडकलेल्या तरुणांना शीख तरुणांनी 'पगडी'चा दोर करुन वाचवलं

जगातील ही सर्वात छोटी बंदूक इतर बंदुकींप्रमाणे काम करते. या छोटी बंदुकीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय. या बंदुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे, ही बंदूक इतकी छोटी आहे, की ती लपवणं सहज शक्य आहे. शर्टाच्या खिशात, ट्राऊझरच्या खिशात, वॉलेटमध्ये अथवा केसातही ही बंदूक लपवता येऊ शकते. त्याच्या याच गुणामुळं काही देशांनी या बंदुकीच्या आयातीवर बंदी घातलीय. विशेषतः अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी ही बंदूक आयात करण्यावर बंदी घातली असून ती बाळगणं बेकायदेशीर ठरवलंय.

Swiss Mini Gun
महिंद्रानी शेअर केलेल्या VIDEO वर नेटकऱ्यांनी शिकवले Traffic Rules

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com