
भारतात ज्या बिस्किटाची किंमत फक्त ५ रुपये आहे तेच बिस्किट पश्चिम आशियातील गाझामध्ये ८० रुपयांना विकलं जात आहे. सोशल मीडियावर एका मुलीच्या बापानं याबाबत केलेली पोस्ट व्हायरल झालीय. मुलीसोबतचे फोटोही यात पोस्ट करण्यात आले आहेत. त्यात म्हटलंय की, बराच वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी मुलीला आवडतं बिस्किट मिळालं.