पाचवीच्या विद्यार्थ्याने दिली सामूहिक गोळीबाराची धमकी; पोलिसांनी केली अटक

kolhapur crime news
kolhapur crime news esakal

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे पाचव्या वर्गातील विद्यार्थ्याने जमावावर गोळीबार (mass shooting) करण्याची धमकी (threat) दिली. १० वर्षीय विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला टेक्स मेसेज पाठवून शाळेत गोळी मारण्याची धमकी दिली. हा मुलगा केप कोरल येथील पॅट्रियट एलिमेंटरी शाळेत शिकतो. अल्पवयीन असल्यामुळे मुलाचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युवा शाखेकडे सोपवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. (Fifth grader threatens mass shooting)

ही बालगुन्हेगारांप्रमाणे वागण्याची वेळ नाही. हा विनोद नाही. या मुलाने खोटी धमकी दिली. मात्र, त्याला याचे खरे परिणाम भोगावे लागतील, असे शेरीफ कार्माइन मार्सिनो सीबीएस १२ शी बोलताना म्हणाले. ली काउंटी शेरिफच्या कार्यालयातील व्हिडिओमध्ये मुलगा बेड्या ठोकून पोलिसांच्या गाडीकडे चालताना दिसत आहे.

kolhapur crime news
आणखी दोन याचिका दाखल; निर्मोही आखाड्याची पक्षकार बनवण्याची मागणी

या विद्यार्थ्याचे वर्तन अतिशय वाईट आहे. विशेषत: टेक्सासमधील उवाल्डे येथे झालेल्या अपघातानंतर. आपली मुले सुरक्षित राहणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे शेरीफ मार्सिनो यांनी अहवालात म्हटले आहे. उवाल्डे येथील हत्याकांडानंतर शेरीफ कार्यालय आता अशा धमक्यांना (threat) गांभीर्याने घेत आहे, असे लोकल १० ने वृत्त दिले आहे. गुप्तहेरांनी मुलाची मुलाखत घेतली आणि नंतर त्याला जमावावर गोळ्या घालण्याची धमकी दिल्याबद्दल जबाबदार धरले.

अमेरिकेचे (america) राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन हे शोककर्त्यांचे सांत्वण करण्यासाठी टेक्सासमधील उवाल्डे येथे पोहोचले. रॉब एलिमेंटरी शाळेमध्ये झालेल्या गोळीबारात १९ मुले आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला होता. गेल्या मंगळवारी ही घटना घडली होती. जेव्हा १८ वर्षीय बंदूकधारी साल्वाडोर रामोसने असॉल्ट रायफल वापरली. या घटनेत सुमारे १७ जण जखमीही झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com