पाकच्या पंजाब विधानसभेत हाणामारी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेत आज नवीन मुख्यमंत्री निवड प्रक्रियेदरम्यान हाणामारी झाली.
fighting in punjab assembly in pakistan
fighting in punjab assembly in pakistansakal
Summary

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेत आज नवीन मुख्यमंत्री निवड प्रक्रियेदरम्यान हाणामारी झाली.

लाहोर - पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांताच्या विधानसभेत (Punjab Vidhansabha Assembly) आज नवीन मुख्यमंत्री निवड (Chief Minister Selection) प्रक्रियेदरम्यान हाणामारी (Fighting) झाली. इम्रान खान (Imran Khan) आणि शाहबाझ शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या पक्षाच्या आमदारांसह पक्षाच्या अन्य नेत्यांमध्ये घमासान झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष सरदार दोस्त मोहंमद मजारी यांच्यासमवेत गैरवर्तन करण्यात आले. इम्रान खान यांच्या पक्षाच्या पीटीआयच्या आमदारांनी त्यांना थोबाडीतही लगावली. पंजाब विधानसभेचे कामकाज सकाळी ११.३० वाजता सुरू होणार होते, परंतु मारहाणीमुळे कार्यवाही होऊ शकली नाही.

राजा परवेझ अश्रफ नॅशनल असेंब्लीचे नवे अध्यक्ष शाहबाज शरीफ सरकारने माजी पंतप्रधान राजा परवेझ यांना नॅशनल असेंब्लीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले असून त्यांना आज पदाची शपथ देण्यात आली. त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, इम्रान खान यांच्या राजवटीत असेंब्लीचे उपाध्यक्ष म्हणून काम करणारे कासीम खान सूरी यांनी आज पदाचा राजीनामा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com