esakal | पंतप्रधानांच्या लो-कट ब्लेझरमुळे वाद; नुकतचं झालंय लग्न!
sakal

बोलून बातमी शोधा

Finland_Sanna_Marin

सोशल डेमोक्रॅटच्या सना मारिन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये सरकार प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आणि देशाच्या इतिहासात सर्वात तरूण पंतप्रधान बनण्याचा विक्रम केला.

पंतप्रधानांच्या लो-कट ब्लेझरमुळे वाद; नुकतचं झालंय लग्न!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हेलसिंकी : काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या फिनलँडच्या पंतप्रधान सना मारिन यांनी लो-कट ब्लेझर घातल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान सना यांनी डीप (प्लंजिंग) नेकलाइन ब्लेझर घातला आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. काही लोकांनी त्यांनी हा ड्रेस परिधान केल्यामुळे टीकेची झोड उठवली असतानाच त्यांच्या समर्थनात मोठ्या संख्येने लोक उतरले आहेत. याच महिन्यात एका फॅशन मासिकाच्या मुखपृष्ठावर ३४ वर्षीय पंतप्रधान सना यांचा फोटो छापण्यात आला होता.

पैगंबर व्यंगचित्र वादः आयफल टॉवरजवळ दोन मुस्लिम महिलांवर चाकू हल्ला​

पंतप्रधानांच्या या वादग्रस्त छायाचित्रात त्यांनी डीप नेकलाइन ब्लेझरखाली शर्ट घातलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान सना यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. तसेच फिनलँडमधील अनेकांनी अशाच प्रकारचे कपडे घालत #ImWithSanna आणि #SupportSanna या हॅशटॅगसह स्वत:चे फोटो पोस्ट केले आहेत. फॅशन मासिकानेही हे चित्र त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहे.

स्त्री जातीच्या द्वेषाशिवाय काही नाही
ट्रेंडी मासिकाची संपादक मारी कार्सिकास यांनी लिहले आहे की, 'लोक काय पाहतात हे या फोटोमुळे स्पष्टपणे दिसून आले. बरेच लोक पंतप्रधान सना यांच्या छातीकडे पाहत नाहीत, तर त्यांनी एक ट्रेंडी ब्लॅक ट्राउजर सूट घातला आहे, याकडे लक्ष्य देत आहेत. ज्यांनी नकारात्मक टिप्पण्या केल्या आहेत, त्याबाबत स्पष्टीकरण करणे खूप अवघड आहे. कारण त्यांना स्त्रियांविरोधात बोलण्याशिवाय दुसरे काही जमत नसेल.

चर्चेदरम्यान माइक ‘म्यूट’; वक्त्यांना समान न्याय मिळण्यासाठी नवा नियम​

या चित्राला विरोध करणाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनी छाती दिसेल, असे कपडे घालू नयेत. हे त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. तर दुसरीकडे, हा एक फॉर्मल ड्रेस असून त्यात वेगळं असं काही नाही, असं पंतप्रधानांना पाठिंबा देणारे म्हणत आहेत. पंतप्रधानांच्या समर्थनार्थ आता मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष अशाच प्रकारच्या कपड्यांमध्ये त्यांचे फोटो पोस्ट करत आहेत.

सोशल डेमोक्रॅटच्या सना मारिन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये सरकार प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आणि देशाच्या इतिहासात सर्वात तरूण पंतप्रधान बनण्याचा विक्रम केला. सना या पाच पक्षांच्या युतीचे नेतृत्व करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)