esakal | तैवानमध्ये 13 मजली इमारत जळून खाक; आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

तैवानमध्ये 13 मजली इमारत जळून खाक; आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तैवान देशाच्या दक्षिणेकडे असलेल्या काऊशुंग या शहरात एका बिल्डींगला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दक्षिण तैवाणमध्ये लागलेल्या आगीमध्ये जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या आगीमुळे 12 लोक जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री एका रहिवासी बिल्डींगमध्ये लागलेल्या आगीमुळे हा जीवित हानी झाली आहे.

हेही वाचा: बैलांच्या नसबंदींवर प्रज्ञा सिंह ठाकूर संतप्त; लागलीच आदेश मागे

पहाटे साधारण तीन वाजता या 13 मजली बिल्डींगमध्ये आग लागली, अशी माहिती काऊशुंग शहरातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 55 जणांना दवाखान्यात नेण्यात आलं असून यामधील 14 जण जबर जखमी आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, मृतांची घोषणा ही दवाखान्यामध्ये खात्री केल्यानंतरच केली जाईल. जवळपास 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहांना थेट अंतिम संस्कारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी दिली आहे.

हेही वाचा: मला चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल काही बोलायचं नाही - रुपाली चाकणकर

दुपारपर्यंत त्या बिल्डींगमध्ये शोधमोहिम तसेच बचावकार्य सुरु होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग इतकी भीषण होती की, त्यामुळे बिल्डींगमधील बहुतांश मजले जळून खाक झाले आहेत.

सध्यातरी या आगीचं कारण अस्पष्ट असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. स्थानिकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी साधारण पहाटे तीन वाजता काही स्फोटांचे आवाज ऐकले. ही बिल्डींग 40 वर्षे जुनी आहे. या बिल्डींगच्या खालच्या मजल्यावर दुकाने असून वर अपार्टमेंट आहे.

loading image
go to top