मेक्‍सिकोत फटाका बाजाराला आग; 29 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मेक्‍सिको :  सॅन पॅबलिटो येथील लोकप्रिय फटाका बाजाराला भीषण आग लागल्याने झालेल्या 29 जणांचा मृत्यु झाला असून 70 जण जखमी झाले आहेत. फटाक्‍याचे हे मार्केट आगीमुळे नष्ट होण्याची गेल्या अकरा वर्षातील ही तिसरी घटना असल्याचे वृत्त "द वॉल स्ट्रीट जनरल'ने दिले आहे.

उत्तर मेक्‍सिकोपासून 32 किलोमीटरवर असलेल्या टूलटेपेक शहराजवळ सॅन पॅबलिटो येथील फटाका बाजारात स्थानिक प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री भीषण आग लागली. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी घटनास्थळाची काही व्हिडिओ प्रसारित केले असून त्यामध्ये आगीचे आणि धुराचे मोठ मोठे लोट घटनास्थळी दिसत आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर फटाका खरेदीसाठी तेथे गर्दी झाली होती. याच वेळी आग लागली. 'आग लागल्यानंतर लोक रडत असल्याचे आणि सगळीकडे धावत असल्याचे चित्र दिसत होते', अशा प्रतिक्रिया सेसर कार्मोना नावाच्या प्रत्यक्षदर्शीने दिली.

जखमींपैकी 13 अल्पवयीन मुले 90 टक्के भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. "या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि हल्ल्यातील पीडितांना आर्थिक मदत करण्यात येईल', अशा प्रतिक्रिया मेक्‍सिकोचे गर्व्हनर एरुव्हिएल अलिव्हा यांनी व्यक्त केली.

Web Title: Fire in Mexico; 29 killed