Australia Fire : दोन वर्षाच्य़ा चिमुकल्याने स्विकारलं वडिलांचे शौर्य पदक; पाहा फोटो !

Firefighter lost life in australia fire son received posthumously bravery award
Firefighter lost life in australia fire son received posthumously bravery award

सिडनी : ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स जंगलात लागलेल्या आगीने देशाचे मोठे नुसकान केले आहे. या आगीत आतापर्यंत 23 जणांना आपला जीव गमवावा लागला असून जवळपास 50 कोटींच्यावर प्राणी-पक्षी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. यामध्ये कोआल व कांगारूंची संख्या सर्वाधिक आहे. ऑस्ट्रेलियातील या आगीचा शेजारील देशावर म्हणजेच न्यूझीलंडवरही परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवळपास तीन हजारपेक्षा जास्त जवान काम करत आहेत. केवळ फोटो पाहूनच या आगीची भीषणता लक्षात येते तरीही घटनास्थळी हे जवान जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. यामध्ये अनेक जवान जखमी झाले असून एक शहीद झाला आहे. 

शहीद झालेल्या जवानाचे नाव जिओफ्री किटन असे असून त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र हा पुरस्कार त्याच्या मुलाने स्विकारला आहे. हा लहानगा फक्त दोन वर्षांचा आहे. चिमुकल्याने त्याच्या वडिलांचे शौर्य पदक स्विकारले असून त्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हारल होत आहे. वडिलांचे शौर्य पदक स्वीकारताना हा लहानगा अग्निशामक दलाच्या गणवेशात दिसला.

जिओफ्री किटन यांनी आग विझवताना प्राण गमावला. त्यांच्यावर न्यू साउथ वेल्स इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले होते. त्यावेळी त्यांचा दोन वर्षांचा मुलगाही अग्निशामक दलाच्या गणवेशात होता. 19 डिसेंबर 2019 ला जिओफ्री यांचा मृत्यू झाला होता. आग विझवत असताना कीटन आणि त्यांच्या एका सहकाऱ्याचाही मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या गाडीवरच झाड कोसळून दुर्घटना घडली होती.

जिओफ्री यांच्या मुलाने पार्थिवाजवळ एक कॉफी मग ठेवला आणि या लहानग्याने डोळ्यात पाणी आणणारा संदेश त्यावर लिहिला. त्यावर चिमुकल्याने  लिहिले होते की,'माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही चंद्रावर जात आहात पण, तिथुन लवकर परत या.'

न्यू साऊथ वेल्स जंगलातील हा वणवा इतका भयंकर आहे की, त्या वणव्यामुळे तेथील आकाशाचा रंग बदलला आहे. ऑस्ट्रेलियासह न्यझीलंडमध्येही या वणव्याचा परिणाम झालाय. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या सीमेवर असलेले हे न्यू साऊथ वेल्स जंगल वणव्याने भरले आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील वातावरणही पूर्ण बदलून गेले आहे. येथील आकाशाचा रंग पिवळा धमक झाला असून धुळीचे साम्राज्य वाढले आहे. 
या भीषण वणव्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्याचा आयोजित भारत दौरा रद्द केलाय. हा वणवा जागतिक वातावरणीय बदलांचा परिणाम आहे असे पर्यावरण अभ्यासकांनी म्हटलं आहे. आगीमुळे ऑस्ट्रेलियातली तापमानही वाढलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com