Crime News : अमेरिकेत बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; आतापर्यंत चार ठार, तर...

firing during birthday party in america
firing during birthday party in america

नवा दिल्ली - अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर या घटनेत अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अलाबामा राज्यातील डॅडव्हिल येथील एका इमारतीभोवती रविवारी पहाटे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

firing during birthday party in america
Viral News : 'वर्किंग आवर्सनंतरही रिप्लाय द्या' कंपनीविरोधात तरूणी थेट कोर्टात, मिळाली एवढी भरपाई

स्थानिक प्रसारमाध्यमे आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अनेक जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. डब्ल्यूआरबीएलच्या वृत्तानुसार, या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास एका किशोरवयीन मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार झाला.

firing during birthday party in america
इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा भाचा ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटकेत; खलिस्तानी संघटनेशीही संबंध

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका शाळेत गोळीबाराची घटना घडली होती. नॅशव्हिल पोलिसांनी सांगितले की, २८ वर्षीय महिला शूटर ठार झाली आहे. मात्र, या घटनेमागचे कारण अद्याप पोलिसांकडून उघड करण्यात आलेले नाही. अधिकारी आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. ज्या शाळेत ही घटना घडली होती ती शाळा प्री-स्कूल होती. त्यात शिकणारी सर्व मुले १२ वर्षांखालील होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com