रशियाने करुन दाखवलं! सर्वातआधी कोविड लस आणली बाजारात

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 September 2020

कोरोना विषाणूवर corona virus प्रभावी ठरणारी पहिली कोरोना लस रशियाने तयार केली आहे.

मॉस्को- कोरोना विषाणूवर russia corona virus प्रभावी ठरणारी पहिली कोरोना लस रशियाने तयार केली आहे. या लशीची पहिली बॅच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्याची घोषणा रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे. 'स्पुटनिक V' Sputnik V नावाची कोरोना लस रशियाच्या गमालिया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट Gamaleya National Research Center of Epidemiology and Microbiology आणि रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF)  यांनी मिळून तयार केली आहे.

सौदी कोर्टाने बदलला निर्णय; 5 दोषींना आता 20-20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

कोरोनावरील 'स्पुटनिक V'लस विषाणूवर प्रभावी सिद्ध झाली आहे. लशीने सर्व आवश्यक कॉलिटी टेस्ट पार केल्याने लशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लशीची पहिली बॅच सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. लवकरच देशाच्या कानाकोपऱ्यात लशीला पोहोचवण्यासाठी योजना बनवली जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात देण्यात आली आहे.  लशीचा डोस रविवारी मॉस्को शहरातील रहिवाशांना देण्यात येणार असल्याचं मॉस्कोचे राज्यपाल सर्गे सोबायनीन यांनी सांगितलं. 

रशियान आरोग्य मंत्रालयाने ११ ऑगस्ट रोजी  'स्पुटनिक V' लशीची नोंदणी केली होती. रशियाचे अध्यक्ष व्हालिदीर पुतीन यांनी स्वत:  या लशीची घोषणा केली होती. ही लस प्रभावी असल्याचा दावा त्यांनी केला होता. शिवाय लशीचा डोस त्यांच्या मुलीलाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रशियाने खूप कमी वेळात लस निर्मिती करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अगदी कमी काळात या लशीची निर्मिती करण्यात आल्याने अनेक तज्यांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे.

corona vaccine updates:भारतातील क्लिनिकल चाचणीसंदर्भात रशियाची मोठी घोषणा

रशियाच्या वैज्ञानिकांनी ४ सप्टेंबर रोजी लॅन्सेट या नियतकालीकात कोरोना लशी संदर्भात शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. यात लस दोन्ही टप्प्यातील मानवी परिक्षणामध्ये यशस्वी ठरल्याचा दावा करण्यात आला. तसेच डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या शरीरात कोणतेही दुष्परिणाम दिसले नसल्याचं सांगण्यात आलंय. भारतासह २० देशांनी रशियाच्या लशीमध्ये रस दाखवला आहे. रशियाने नुकतेच भारतासोबत लशीसंबंधातील माहिती शेअर केली आहे. त्यामुळे रशियाच्या स्पुटनिक V लशीचे भारतात तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, जगभरातील अनेक देश कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्याच्या शर्यतीत आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीन या देशांच्या लशीने मानवी चाचणीचा तिसरा टप्पा गाठला आहे. मात्र, रशियासोडून इतर कोणत्याही देशाने कोरोना लशीचा वापर सर्वसामान्यांवर करण्याचा कोणताही इरादा व्यक्त केला आहे. हे देश २०२१ च्या सुरुवातील कोरोना लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.  

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Batch Of Russia Covid Vaccine Sputnik V Released Into Public