cm devendra fadnavis
sakal
दावोस - स्वित्झर्लंडमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्लूईएफ) वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण विकास केंद्र म्हणून घोषणा परिषदेच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आली.