Global News | 'लवकर भेटू', म्हणत ६० वर्षीय वृद्धाने स्वीकारला इच्छामृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

euthanasia
'लवकर भेटू', म्हणत ६० वर्षीय वृद्धाने स्वीकारला इच्छामृत्यू

'लवकर भेटू', म्हणत ६० वर्षीय वृद्धाने स्वीकारला इच्छामृत्यू

कॅली : इच्छामृत्यूवरून जगात अनेक मतभेद आहेत. जगण्याची इच्छा संपलीय असं म्हणत अनेकजण इच्छामृत्यूसाठी परवानगी मागतात. काही देशात कायद्याने याला परवानगीसुद्धा आहे. आता यामध्ये आणखी एका देशाचा समावेश झाला आहे. कोलंबियातील (Colombia) 60 वर्षीय वृद्धाने इच्छा मृत्यू(Death) स्वीकारला. मृत्यूच्या आधी काही तास त्यानं आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत केला. मला खूपच शांत असं वाटत आहे. माझ्यासोबत जे होणार आहे त्याची मला भीती वाटत नाही. मी निरोप घेतो असं नाही तर लवकरच भेटणार असं म्हणणार आहे असे त्या वृद्धाचे शेवटचे शब्द होते. एका असाध्य रोगाशी झुंज देणाऱ्या विक्टर एक्सोबार यांनी शुक्रवारी इच्छामृत्यूने जगाचा निरोप घेतला. त्यांनी सार्वजनिकरित्या मृत्यू स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.(Euthanasia)

हेही वाचा: CM योगींच्या मंत्र्याचा राजीनामा; भाजपसोडून सायकलवर स्वार

एस्कोबार यांना वेदनादायी असा दुर्मीळ, असाध्य आजार झाला होता. त्यामुळे इच्छा मरणाची मागणी त्यांनी केली होती. इच्छामृत्यू स्वीकारणारे एस्कोबार हे कोलंबियाचे पहिलेच नागरिक ठरले. इच्छामृत्यूवेळी एस्कोबार यांनी म्हटलं होतं की, मी खूपच शांतता अनुभवत आहे. माझ्यासोबत आजा जे होणार आहे त्याची भीती वाटत नाही. मला हळू हळू बेशुद्ध केलं जाईल आणि माझी निरोप घेण्याची वेळ येईल. त्यानंतर माझ्या इच्छेनुसार प्राणघातक असं इंजेक्शन मला टोचलं जाईल ज्याने मला वेदना होणार नाहीत पण शांतपणे मृत्यू येईल. माझा देवावर विश्वास आणि की सगळं असंच घडेल.

हेही वाचा: लोणावळ्याला फिरायचा प्लान करताय! आधी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश वाचा

इच्छामृत्यूसाठीची प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी पूर्ण झाली. एस्कोबार यांचे वकील लुईस गिराल्डो यांनी एस्कोबार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. गेल्याच वर्षी जुलै महिन्यात कोलंबियाच्या न्यायालयाने निर्णय देताना इच्छा मृत्यूच्या नियमांमध्ये बदल केला होता. त्यात ज्यांना लगेच मृत्यू येण्याची शक्यता नाही, मात्र मानसिक त्रास किंवा शारिरिक पीडा सहन करत आहेत अशा लोकासांठी सूट देण्यात आली. न्यायालयाने नियम बदलले तरी कॅथलिक चर्च मात्र या निर्णय़ाच्या विरोधात आहे. सध्या जगात युरोपातील बेल्जियम, नेदरलँड, लक्झमबर्ग, स्पेनमध्ये इच्छा मृत्यूला कायदेशीर परवानगी आहे.

हेही वाचा: लोणावळ्यातील लायन्स पॉइंट बंद

एस्कोबार यांनी म्हटलं होतं की, इच्छा मृत्यूच्या नियमातील बदलाना एक दरवाजा उघडला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या रुग्णाला प्रतिष्ठेने मरण्याची संधी मिळेल. एस्कोबार हे २००८ पासून आजारी होते. दोन वेळा अटॅकमुळे त्यांना पक्षाघात झाला होता. हळू हळू ते बरे झाले मात्र श्वास घेण्यास त्रास होत होता. यात त्यांना फुफ्फुसाचा आजार, हायपरटेन्शन, मधुमेह इत्यादी आजारांनी ग्रासले. त्यांच्यावर औषधांचाही परिणाम होत नव्हता .

अखेरच्या क्षणी एस्कोबार यांच्यासोबत त्यांचे कुटुंबिय होते. इच्छामृत्यूसाठी त्यांना प्राणघातक इंजेक्शन देण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर आणि वकीलसुद्धा उपस्थित होते. एस्कोबार यांनी म्हटलं की, माझ्यासारख्या रुग्णांना आराम मिळावा, वेदनेतून सुटका मिळावी यासाठी माझी ही कहाणी लोकांना लक्षात रहावी.'

Web Title: First Colombian With Non Terminal Illness Dies Legally By Euthanasia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global news
go to top