Monkeypox Virus :ब्रिटननंतर अमेरिकेत आढळला पहिला रुग्ण, काय आहेत लक्षणं?

US Reported First Monkeypox Case
US Reported First Monkeypox Casee sakal

ब्रिटननंतर आता अमेरिकेतही 'मंकीपॉक्स' विषाणूचा (Monkeypox Virus) संसर्ग पसरतो आहे. नुकतेच कॅनडातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्स विषाणूची (US Reported First Monkeypox Case) लागण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली असून यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) येथे नमुने तपासण्यात आले आहेत.

US Reported First Monkeypox Case
कोरोनानंतर Monkeypox चा धोका; अशी आहेत लक्षणे

सार्वजनिक आरोग्य विभाग CDC, संबंधित स्थानिक आरोग्य मंडळे संक्रमित लोकांसाठी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या स्थानिक मंडळांसोबत काम करत आहे. संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटवणे हा यामागचा उद्देश आहे. प्रसिद्धीनुसार, समाजातील इतर लोकांना संसर्गापासून फारसा धोका नाही. बाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चांगली आहे.

विशेष म्हणजे, २०२२ पूर्वी युनायटेड स्टेट्समध्ये मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तर टेक्सास आणि मेरीलँडमध्ये, 2021 मध्ये नायजेरियाला जाणाऱ्या लोकांमध्ये एक रुग्ण आढळून आला होता. त्याचवेळी, ब्रिटनने या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला मंकीपॉक्सचे 9 रुग्ण सापडल्याचे सांगितले. यापैकी एक संक्रमित नुकताच नायजेरियाला गेला होता. इतर संक्रमितांपैकी कोणीही अलीकडच्या काळात प्रवास केला नाही.

काय आहेत लक्षणं? -

मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ आणि गंभीर विषाणूजन्य आजार आहे. या आजारात सुरुवातीला हलका ताप येतो. त्यानंतर लिम्फ नोड्सवर सूजन येतेय. त्यानंतर अशीच सूजन चेहऱ्यावर आणि शरीरावर येते. शरीरावर मोठमोठे फोड येतात. संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन आठवडे ही पुरळ शरीरावर असते. हा संसर्ग लोकांमध्ये सहज पसरत नाही. परंतु, शरीरातील द्रवपदार्थ, संक्रमित व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू, समोरासमोर दीर्घकाळ संपर्क आणि श्वसनामुळे संसर्ग पसरू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com