esakal | जपानमध्ये केवळ एक टक्के नागरिकांना पहिला डोस

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine
जपानमध्ये केवळ एक टक्के नागरिकांना पहिला डोस
sakal_logo
By
पीटीआय

टोकियो - जपानमध्ये लसीकरण मोहीम संथगतीने होत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणीचा विचार झाल्यास ऑलिंपिक स्पर्धा पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. जपानची लोकसंख्या १२ कोटीपेक्षा अधिक असताना आतापर्यंत २१ लाखापर्यंतच लसीकरण झाले.

कोरोनामुळे टोकियो, ओसाका आणि ह्योगो प्रांतात स्थिती बिघडत आहे. यामागे जपानमध्ये संथगतीने होत असलेले लसीकरण कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. जपानमध्ये आतापर्यंत २० लाख ५४ हजार ८८० जणांना लस देण्यात आली आहे. देशाची लोकसंख्या १२ कोटी ६१ लाख असताना आतापर्यंत १ टक्के नागरिकांना पहिला डोस तर ०.६ टक्के नागरिकांना दोन्ही डोस दिले आहेत. संसर्गामुळे ऑलिंपिक स्पर्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रांताच्या गर्व्हनर मंडळींनी आणीबाणी लागू करण्याची मागणी केली. टोकियोत २९ एप्रिल ते ९ मे पर्यंत आणीबाणी लागू होऊ शकते.

हेही वाचा: ऑस्ट्रेलियाचा चीनला दणका; 'बेल्ट अँड रोड' प्रोजेक्ट केला रद्द

सप्टेंबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक गोळी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी येत्या सप्टेंबर-डिसेंबर या काळात कोरोनापासून बचाव करणारी गोळी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. या गोळीमुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासणार नाही आणि घरातच राहून गोळीचे सेवन करावे लागेल.

कोरोनाची चौथी लाट

ब्राझिल, तुर्कस्तान, फ्रान्स, अर्जेटिना, इराण, कोलंबिया, जर्मनी, इटली, पेरू आणि पोलंड सारख्या देशात दररोज दहा हजाराहून अधिक नागरिक बाधित होत आहेत. त्याचबरोबर कोरोनाची चौथी लाट आली आहे.