Gaza Air Drop: गाझामधील दुर्दैवी घटना, हवेत पॅराशूट न उघडल्याने 5 जणांचा मृत्यू; पाहा व्हिडिओ

Aid package dropped by air into Gaza : गाझामध्ये मदत सामुग्री असलेले पॅराशूट अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पॅराशूट हवेत उघडले न गेल्याने ते मुक्तपणे खाली कोसळले.
Gaza Air Drop
Gaza Air Dropesakal

नवी दिल्ली- गाझामध्ये मदत सामुग्री असलेले पॅराशूट अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पॅराशूट हवेत उघडले न गेल्याने ते मुक्तपणे खाली कोसळले. यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर अनेकजण जखमी झाल्याचं कळत आहे. बीबीसीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Five people have died after a parachute failed on an aid package dropped by air into Gaza)

प्रत्यक्षदर्शींनी आणि हमासकडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. हवेत पॅराशूट उघडले गेले नाही आणि मदत सामुग्री खाली उभे असलेल्यांच्या लोकांवर पडली. कोणाकडून पाठवलेली ही मदत होती हे कळू शकलेलं नाही. ( Five people have died after a parachute failed on an aid package dropped by air into Gaza)

Gaza Air Drop
Farooq Abdullah: काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानशी बोला अन्यथा येथेही गाझा; फारुख अब्दुल्ला यांचा इशारा

यूएस, जॉर्डन, इजिप्त, फ्रान्स, नेदरलँड आणि बेल्जियम गाझामध्ये गेल्या काही दिवसांपासून मदत पुरवत आहेत. इस्राइलसोबतच्या संघर्षामुळे गाझामधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे कृत्रिम दुष्काळ निर्माण झाला आहे. यासाठी काही देशांकडून हवेतून मदत दिली जात आहे.

सीबीएस न्यूजने यासंदर्भातील माहिती देताना सांगितलं की, स्थानिक वेळेनुसार ११:३० वाजता हा अपघात घडला. गाझामध्ये संयुक्तपणे मदत दिली जात होती. जॉर्डनियन एअर फोर्सच्या माध्यमातून ही मदत दिली जात होती असं अमेरिकेने सांगितलं आहे. पण, जॉर्डनियन स्टेट टीव्हीने सांगितलंय की, या सर्व प्रकारात जॉर्डनियन एअरक्राफ्टचा कोणताही सहभाग नव्हता.

Gaza Air Drop
Israel Hamas War: गाझा पट्टीत आतापर्यंत २०,००० जणांचा मृत्यू, तर १९ लाख लोक झाले विस्थापित

उत्तर गाझातील भाग मदतीपासून वंचित आहे. अशा वेळी कार्गो सी-१७ मधून अल-शफ्ती येथे मदत सामुग्री हवेतून रॉकेटप्रमाणे खाली पडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यातील अनेक मदत सामुद्री व्यवस्थितपणे जमिनीवर उतरत असल्याचं दिसत आहे. त्यातील एक हवाई मदत मुक्तपणे खाली पडत असल्याचं दिसतंय.

युनायटेड नेशन्सच्या माहितीनुसार, जवळपास २३ लाख लोकसंख्या ही उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक लहान मुले अन्नासाठी तडफडत आहेत. दरम्यान, हमास आणि इस्राइल सैन्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भीषण संघर्ष आहे. अद्याप हा संघर्ष थांबण्याचे चिन्हं नाहीत. इस्राइलने आक्रमक पवित्रा घेतला असल्याने अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com