239 प्रवासी...10 वर्षांपासून MH370 विमान गायब; समोर आली धक्कादायक माहिती

MH370 was buried in an ocean: २०१४ मध्ये एक विमान अचानक गायब झालं होतं. जवळपास दहा वर्षे झाले तरी विमान गायब होण्याचं रहस्य अद्याप समजू शकलेलं नाही.
plane
planeesakal

नवी दिल्ली- २०१४ मध्ये एक विमान अचानक गायब झालं होतं. जवळपास दहा वर्षे झाले तरी विमान गायब होण्याचं रहस्य अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेने जगाला देखील कोड्यात टाकलं आहे. हवाई क्षेत्राच्या इतिहासातील हे सगळ्यात मोठे रहस्य मानले जाते. MH370 विमानाचे काय झालं, ते कुठं गेलं याचा काहीच पत्ता लागू शकलेला नाही. या विमानात २३९ प्रवासी होते.

नुकतीच MH370 विमानाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ब्रिटिश एक्सपर्ट आणि बोईंग 777 पायलटने दावा केलाय की, MH370 च्या पायलटने सामूहिक हत्या आणि आत्महत्येचा कट रचला होता. फ्लाईटच्या टेक-ऑफ डॉक्युमेंट्समधून या गोष्टीचे पुरावे मिळतात. (Flight documents show MH370 was buried in an ocean trench by pilot says Boeing expert)

plane
Delayed Flights:...तर एअरलाईन्सला रद्द करावी लागणार फ्लाईट; DGCA कडून मोठा बदल

विमानात बदल

मलेशियाच्या या एयरलाईन्समध्ये फ्लाईटआधी काही बदल करण्यात आले होते. फ्लाईट प्लॅन किंवा टेक्निकल लॉगमधून समजतंय की विमानामध्ये ३ हजार किलोग्रॅम इंजिन आणि अतिरिक्त ऑक्सिजनसह अन्य काही बदल करण्यात आले होते. इंडिपेंडेंट यूकेच्या रिपोर्टमध्ये एक्सपर्ट सायमन हार्डी यांनी हा दावा केला आहे. सायमन यांनी सांगितलंय की, पायलट जहरी अहमद शाह यांनी विमानाला गायब करण्याचा कट रचला होता.

विमान गायब झाल्यानंतर २०१५ मध्ये याप्रकरणी तपासासाठी एक टीम स्थापन करण्यात आली होती. सायमन हार्डी या टीमचे सदस्य होते. त्यांनी 'द सन'ला बोलताना सांगितलं की, विमानात करण्यात आलेले बदल हे फ्लाईट गायब होण्याच्या पूर्वी करण्यात आले होते. यामध्ये फक्त कॉकपिटमध्ये ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यात आली होती. शेवटच्या क्षणी इंजिनमध्ये बदल करण्यात आले. त्याची काहीही आवश्यकता नव्हती.

plane
GoAir: तिकीटाचा घोळ अन् एक लाखाचा दंड; गुजराती प्रवाशाने शिकवला विमान कंपनीला धडा, काय आहे प्रकरण?

पायलटने रचला होता नियोजित कट

रीयूनियन द्वीपवर विमानाचा एक भाग सापडला होता. यावरुन अंदाज केला जाऊ शकतो की विमानातील पायलट शेवटपर्यंत जिवंत होता. आपण काय करत आहोत याची जाणीव पायलटला होती. पायलटला इंजिनचे अवशेष मागे ठेवायचे नव्हते. विमानातील २३९ प्रवाशांना बेशुद्ध करण्यासाठी केबिनमधील एअर प्रेशर कमी करण्यात आले. त्यानंतर पायलटने विमान समुद्रात पाडण्यासाठी यू-टर्न घेतला.

सॅटेलाईटसंबंधी पुरावे आणि अन्य माहितीच्या आधारे असं सांगितलं जाऊ शकतं की, दक्षिण हिंद महासागराच्या गिल्निनक फ्रॅक्चर झोनमध्ये विमान गायब झालेलं असणार. या ठिकाणी विमानाला जलसमाधी मिळालेली असू शकते. मलेशिया सरकारने या विमानाचा शोध सुरु केला होता. पण, काही काळानंतर विमान 'नो फाईंड' म्हणून जाहीर केलं होतं. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com