अफगाणिस्तानात ७० मृत्युमुखीच; शंभरहून अधिक जण जखमी

पीटीआय
Thursday, 27 August 2020

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे अनेक घरे पडली आहे. येथे बचाव कार्य अद्याप सुरु असून ढिगाऱ्यांखाली आणखी काही जण दबले असण्याची शक्यता असल्याने मृतांची संख्या वाढू शकते.

काबूल - अफगाणिस्तानात अनेक ठिकाणी आलेल्या पुरामुळे आतापर्यंत किमान ७० जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. मोसमी पावसाने देशाच्या उत्तर आणि पूर्व भागाला झोडपून काढले आहे. 

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे अनेक घरे पडली आहे. येथे बचाव कार्य अद्याप सुरु असून ढिगाऱ्यांखाली आणखी काही जण दबले असण्याची शक्यता असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. मृतांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही अधिक असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. पारवान प्रांतात काल धुवाँधार पाऊस कोसळल्याने रात्रीतून पूर आला. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. या प्रांताच्या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 अध्यक्ष अश्रफ घनी यांनीही पारवान प्रांताकडे बचाव पथके रवाना केली आहेत. पुरामुळे अनेक महामार्गांवर पाणी आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods in Afghanistan have killed at least 70 people and injured more than 100

Tags
टॉपिकस
Topic Tags: