व्हेनिसला तिसऱ्यांदा पुराचा तडाखा

पीटीआय
Sunday, 17 November 2019

- कालव्यांचे शहर अशी ओळख असलेल्या व्हेनिसला आठवडाभरात तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे.

व्हेनिस : कालव्यांचे शहर अशी ओळख असलेल्या व्हेनिसला आठवडाभरात तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. शहरात रविवारी पाच फुटांपर्यंत समुद्राचे पाणी घुसले होते. त्यामुळे या ऐतिहासिक शहरात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. 
वादळासह जोरदार वाऱ्यामुळे शहरात समुद्राचे पाणी घुसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या वादळामुळे शहरातील प्रसिद्ध सेंट मार्क स्क्वेअर व इतर पर्यटनस्थळे आजही काही काळ बंद ठेवण्यात आली होती. त्यातच आठवडाभरापासून पूरस्थिती असल्याने शहरातील इतर पर्यटनस्थळेही बंद ठेवण्यात आली होती. या पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत एक अब्ज युरोचे नुकसान झाल्याचे व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुग्नो यांनी सांगितले. पुरामुळे शहराच्या संरक्षणासाठी सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली असून, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. 

या संकटावर मात करण्यासाठी सरकार 20 दशलक्ष युरो एवढा निधी देणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पुरामुळे 50 पेक्षा जास्त चर्चचे नुकसान झाले असून, त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इटलीचे संस्कृतिक मंत्री डारिओ फ्रान्सेशिनी यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: floods comes in Venice three times