म्युझिक कॉन्सर्टमध्ये अंधाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू

एसयूव्ही गाडीतून आलेल्या तिघांनी उपस्थित लोकांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. हा हल्ला ठरवून करण्यात आलेला हल्ला आहे.
म्युझिक कॉन्सर्टमध्ये अंधाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू
Summary

एसयूव्ही गाडीतून आलेल्या तिघांनी उपस्थित लोकांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. हा हल्ला ठरवून करण्यात आलेला हल्ला आहे.

वॉशिंग्टन : दक्षिण फ्लोरिडातील एका बँक्वेट हॉलमध्ये काही अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोघांचा मृत्यू तर जवळपास २० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिमी मियामी-डाडे काउंटीच्या एल. मुला बँक्वेट हॉलमध्ये रविवारी (ता.३०) सकाळी गोळीबाराला सुरवात झाली. घटनास्थळ हायालियापासून जवळ आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Florida shooting 2 dead and 20 injured in shooting incident in Miami)

तिघांनी केला हल्ला

मियामी-डाडेचे पोलिस संचालक अल्फ्रेडो रेमीरेज III म्हणाले की, म्युझिक कॉन्सर्टसाठी बँक्वेट हॉल भाडे करारावर देण्यात आला होता. एसयूव्ही गाडीतून आलेल्या तिघांनी उपस्थित लोकांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. हा हल्ला ठरवून करण्यात आलेला हल्ला आहे.

अद्यापपर्यंत अटक नाही

रेमीरेज पुढे म्हणाले की, हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याचे दिसून येते. अत्यंत क्रुरपणे केलेल्या या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर २० हून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अंधाधुंद गोळीबाराच्या घटना अमेरिकेत नित्याचेच झाले आहे. अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. याआधी शाळा, ऑफिस आणि शॉपिंग सेंटरला लक्ष करण्यात आले होते. अमेरिकेत गेल्या वर्षी गोळीबाराच्या घटनेत ४३ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com