पाहुणे जात नसतील तर..? गोळ्या घाला..!

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नको त्या वेळी घरी पाहुणे आले, विनंती करूनही ते जात नसतील, तर तुम्ही काय करता? फ्लोरिडातल्या एका महिलेने तिच्या नको असलेल्या पाहुण्यांवर चक्क गोळीबार केला. या गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी घडली. ऍलना ऍनेट सॅव्हेल असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. 'हॅंग आऊट'साठी एक महिला व एक पुरुष सोमवारी रात्री 1.00 वाजता सॅव्हेलच्या घरी गेले होते. काही वेळानंतर सॅव्हेलने त्या दोघांना निघून जाण्यास सांगितले. तरीही ते पाहुणे घरातून बाहेर पडत नव्हते. त्यानंतर सॅव्हेलने घरातील 0.22 कॅलिबरची पिस्तूल काढून पाहुण्यांच्या पायावर गोळीबार सुरू केला.

विशेष म्हणजे सॅव्हेलच्या मित्रानेच तिला असे करण्यास सांगितले होते. 'त्यांना जाण्याची सूचना तीन वेळा केली आणि तरीही ते गेले नाहीत, तर बंदूक घेऊन जमिनीवर गोळीबार करायचा,' असे त्याने सॅव्हेलला सांगितले होते. सॅव्हेलने गोळीबार केल्यानंतर पाहुणे निघून जात असताना त्यातील महिलेच्या पायाला जखम झाली. या गोळीबारात सॅव्हेलचा मित्रही जखमी झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सॅव्हेलच्या घरी दूरध्वनी होता. त्यामुळे पाहुणे त्रास देत असतील, तर 911 ला कळविणे त्यांना शक्‍य होते. गोळीबार केल्यानंतर सॅव्हेलने ती बंदूक घराबाहेर कचऱ्याच्या पेटीत टाकून दिली. तिला पहाटे चारच्या सुमारास अटक करण्यात आली.

Web Title: Florida woman accused of shooting at house guests who wouldn't leave

टॅग्स