Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

Israeli Passengers Claim flydubai Cabin Crew Demanded Tied-Up Omani Co-Pilot Be Released: 174 प्रवासी असलेल्या 'FZ1073' या विमानामध्ये सहवैमानिक हमम अल-हमामी याने विमानातील इमर्जन्सी उपकरणाने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला होता.
flydubai Cabin Crew

flydubai Cabin Crew

esakal

Updated on: 

Israeli Passengers Claim: दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानामध्ये भारतीय कॅप्टनवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ओमानी सहवैमानिकाला रोखणाऱ्या इस्रायली प्रवाशांनी एक अत्यंत धक्कादायक दावा केलाय. कॉकपिटमध्ये घुसून सहवैमानिकाला बांधून ठेवल्यानंतर काही केबिन क्रू सदस्यांनी त्याला सोडण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, प्रवाशांनी ही मागणी थेट फेटाळून लावत क्रू सदस्यांना कॉकपिटपासून लांब नेऊन बसवले. 'द न्यू यॉर्क पोस्ट'ने हे वृत्त दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com