

Axe Attack on Main Pilot During Flight; Possibility of 'Firing Squad' Execution in UAE
Sakal
दुबई : फ्लाईदुबईच्या विमानाचे इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर आत्मघातकी क्रॅश लँडिंग करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेला को-पायलट हमाम अल-हम्मामी (वय २९) याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येण्याची शक्यता आहे. उड्डाणादरम्यान मुख्य पायलटवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्या या को-पायलटच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. युएईच्या कायद्यानुसार, त्याला दोषी ठरवल्यास ‘फायरिंग स्क्वॉड’द्वारे ९ बंदूकधाऱ्यांकडून ही शिक्षा अमलात आणली जाऊ शकते.