उडणारी टॅक्सी लवकरच बाजारात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

ही उडणा-या गाड्यांची संकल्पना एका जर्मन कंपनीने मांडली आहे. 

हाँग-काँग : आतापर्यंत ब-याच चित्रपटात दाखवण्यात येणारी भविष्यातील शहरांत प्रामुख्याने दिसणा-या उडत्या गाड्या लवकरच सत्यात देखील दिसणार आहेत. ही उडणा-या गाड्यांची संकल्पना एका जर्मन कंपनीने मांडली आहे. 

2025 पर्यंत म्हणजेच पुढील सहा वर्षात उडणारी टॅक्सी नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती या कंपनीने दिली आहे. पाच जणांची आसनक्षमता असणारी ही टॅक्सी बॅटरीवर चालणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या टॅक्सीची बॅटरी 300 किमीचा प्रवास अवघ्या 60 मिनिटांत करू शकणार आहे.

विशेष म्हणजे ओला उबरप्रमाणेच अॅपद्वारे ही उडणारी टॅक्सी बोलवता येणार आहे. तसेच टॅक्सींचे भाडे नक्की किती असेल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नसली तरीदेखील सामान्यांना परवडेल असेच भाडे असणार असल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flying taxi service is coming soon