

US delegation China
ESakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनचा दौरा पूर्ण करून अमेरिकेत परतले आहेत. नऊ वर्षांनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला हा पहिलाच दौरा असून संपूर्ण जग या दौऱ्याकडे लक्ष ठेवून होते. मात्र, ट्रम्प चीनहून परतत असताना एक अशी रंजक घटना घडली, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. चीन दौऱ्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अमेरिकी शिष्टमंडळाचे फोन, अधिस्वीकृती कार्ड आणि इतर अनेक वस्तू कचऱ्यात फेकून दिल्या.