लोकसंख्या घटविण्यासाठी बळजबरीने नसबंदी, अटकसत्र

पीटीआय
मंगळवार, 30 जून 2020

शिजिआंग प्रांतात मुस्लिमांची संख्या अधिक
शिनजिआंग प्रांतात मुस्लिमांची संख्या अधिक असून, याच प्रांतात नसबंदीचे आणि गर्भधारणाविरोधी उपकरणे वापरण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून आले. खूप सारी मुले असणे हे तुरुंगात टाकण्याचे पुरेसे कारण असून त्यांनी प्रचंड मोठा दंड भरल्याशिवाय सोडले जात नाही. पोलिसांची वस्त्यांमध्ये धाड पडते आणि ते घरात घुसून मुलांची गणना करतात.

बीजिंग - चीनमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी सरकार राक्षसी उपाय योजत असून, उईगर मुस्लिमांमधील जन्मदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे एका संशोधनात सिद्ध झाले. विशेष म्हणजे चीनमध्ये बहुसंख्येने असलेल्या हान समुदायाला अधिक संततीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनमधील मुस्लिम समाजातील महिलांवर अपत्यप्राप्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीही बळजबरी केली जात असली, तरी आता हा प्रकार अधिक पद्धतशीरपणे राबविला जात असल्याचे लक्षात आले आहे. सरकारी नोंदी आणि ताबा केंद्रांमधील मुस्लिमांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला.

कराचीत स्टॉक एक्स्चेंजवर हल्ला

चीन सरकार चार वर्षांपासून शिनजिआंग प्रांतात ही मोहीम राबवित असून यामुळे उईगर मुस्लिमांचा वंशच्छेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका होत आहे. उईगर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजातील महिलांची सातत्याने गर्भचाचणी केली जाते, बळजबरीने नसबंदी करणे आणि प्रसंगी गर्भपातही करणे, असे प्रकार चीन सरकारकडून सुरू आहेत.

ढाक्यात नौका उलटून ३२ प्रवाशांना जलसमाधी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forced sterilization arrest to reduce population

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: