हाफीज सईदला ठार मारण्याचा कट 

hafiz Saeed
hafiz Saeed

लाहोर : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याला ठार मारण्याचा कट परदेशी गुप्तचर संस्थेने आखला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे सईदच्या सुरक्षेत वाढ करावी, असे पत्र सरकारने पंजाब प्रांताच्या गृह विभागाला पाठविले आहे. 

राष्ट्रीय दहशतवादविरोधी पथकाने पाठविलेल्या या पत्रात म्हटले आहे, की सईदला ठार मारण्यासाठी परदेशी गुप्तचर संस्थेने दोघांना आठ कोटी रुपये दिले आहेत.''

जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या असलेला सईद सध्या लाहोर येथील घरात तीस जानेवारीपासून नजरकैदेत आहे. गृह विभागाने नुकतीच त्याची नजरकैद 26 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com