esakal | तालिबानचा हिंसाचार, भारत अफगाणिस्तानच्या पाठिशी उभा राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

तालिबानचा हिंसाचार, भारत अफगाणिस्तानच्या पाठिशी उभा राहणार

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: सध्या अफगाणिस्तानात (afganistan) मोठ्या प्रमाणावर हिंसाचार (violence) सुरु आहे. तालिबान (taliban) आणि अफगाण सैन्यामध्ये लढाई सुरु आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (s jaishankar) यांनी गुरुवारी ताश्कंत (Tashkent) येथे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांची भेट घेतली. (Forign minister s jaishankar talks with afgan president vows support amid taliban violence dmp82)

या भेटीमधून भारताने अफगाणिस्तानला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. "अश्रफ घानी यांच्याबरोबर समाधानकारक चर्चा झाली. सध्याच्या अफगाणिस्तानातील परिस्थितीबद्दल संवाद झाला. अफगाणिस्तानात स्थिरता, शांतता आणि विकासाला आमचा पाठिंबा आहे" असे जयशंकर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. जयशंकर यांनी अमेरिकेचे विशेष दूत झालमे खलिलझाद आणि उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लिझा शेरवूड यांच्याबरोबरही अफगाणिस्तानातील बिघडत्या परिस्थितीबद्दल चर्चा केली.

हेही वाचा: पावसाने काढली मुंबईकरांची 'विकेट'; लोकल, रस्तेवाहतूक कोलमडली

परराष्ट्रनीतीचा विचार करता, अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या हातात जाणे भारताच्या हिताचे नाही. कारण तालिबानच्या राजवटीला पाकिस्तानचा उघड तर चीनचा छुपा पाठिंबा असणार. हे दोन्ही देश भारताचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे तालिबानचा वापर ते भारताविरोधात करु शकतात.

हेही वाचा: 'टी सिरिज'च्या भूषण कुमारांवर अंधेरीत बलात्काराचा गुन्हा दाखल

पडद्यामागून भारताने सुद्धा तालिबानी नेत्यांसोबत चर्चा केल्याचे वृत्त मध्यंतरी आले होते. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघारी फिरताच तालिबान अधिक आक्रमक झाले. अफगाणिस्तानातील काही भागात तालिबानची राजवट लागू झाल्याच्या बातम्या येत आहेत. बदाखशानमध्ये तालिबानी राजवट सुरु झाल्याचे वृत्त आहे. तालिबानच्या राजवटीत स्त्रियांचा अनादर केला जातो. त्यांना अत्यंत जुलमी पद्धतीने वागवले जाते.

loading image