esakal | पावसाने काढली मुंबईकरांची 'विकेट'; लोकल, रस्तेवाहतूक कोलमडली
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Rains-Local-Traffic-Jam

पावसाने काढली मुंबईकरांची 'विकेट'; लोकल, रस्तेवाहतूक कोलमडली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शहर आणि उपनगरात पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतूकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मुंबईतील गोरेगाव, अंधेरी, वांद्रे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र दिसले. तर पावसाच्या तडाख्याने रेल्वे रुळावर पाणी साठण्यास सुरूवात झाली. त्यामुळे मध्ये आणि हार्बर मार्गावरील ट्रेन्स सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. (Heavy Rainfall in Mumbai Waterlogging on railway Tracks locals running 25 mins late traffic jam on Mumbai Road)

हेही वाचा: मुंबई, उपनगरांत पहाटेपासूनच पावसाला जोर; सखल भाग 'जलमय'

सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर आणि चेंबूर परिसरात रेल्वे रूळांवर पाणी साचल्याचे चित्र दिसले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. रात्री १२ ते सकाळी ८ या कालावधीत १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या एका तासात ४० मिमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा: 'टी सिरिज'च्या भूषण कुमारांवर अंधेरीत बलात्काराचा गुन्हा दाखल

सायन कुर्ला स्थानका दरम्यान रुळावर पाणी. त्यामुळे या भागातील धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. गाड्या २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कर्जत आणि कसारा मार्गावर विशेष लोकल चालवल्या जात आहेत. हार्बर मार्गावर चुनाभट्टीजवळ रुळावर पाणी. या मार्गावरील वाहतूकही २० ते २५ मिनिटं उशिराने सुरु आहे. ट्रान्स हार्बर (ठाणे-पनवेल) मार्गावर रेल्वे नियोजित वेळापत्रकानुसार धावत आहेत. तसेच, पश्चिम रेल्वे मार्गावरही वाहतूक सुरळीत सुरू आहे.

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

याशिवाय, पावसामुळे रस्तेवाहतूकीवरही परिणाम झाला आहे. रस्त्यांवर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. तसेच, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचेही चित्र आहे.

loading image