Fawad Chaudhry : निवडणूक आयोगाला धमकावणं पडलं भारी; PTI च्या बड्या नेत्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fawad Chaudhry Imran Khan

फवाद चौधरींसह पीटीआय नेत्यांवर निवडणूक आयोगाला धमकावल्याचा आरोप आहे.

Fawad Chaudhry : निवडणूक आयोगाला धमकावणं पडलं भारी; PTI च्या बड्या नेत्याला अटक

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांना पोलिसांनी अटक केलीये.

फवाद यांना लाहोर येथून अटक करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं (Pakistan Election Commission) फवाद यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.

इम्रान खान यांनाही अटक होणार?

फवाद चौधरींच्या अटकेनंतर इम्रान खान यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

हेही वाचा: 'ती' तुम्हाला 3 हजार देत असेल, तर आम्ही एका मतासाठी 6 हजार देऊ; भाजपच्या बड्या नेत्याची मतदारांना 'ऑफर'

पीटीआय नेत्यांचा हल्लाबोल

फवाद यांच्या अटकेनंतर पीटीआय नेत्यांनी सरकारविरोधात आंदोलन करायला सुरुवात केलीये. पक्षाचे नेते हाफिज फरहाद अब्बास यांनी सांगितलं की, 'फवाद चौधरी यांचं घरातून बेकायदेशीरपणे अपहरण करण्यात आलं आहे. त्यांचा दोष हा की त्यांनी न्याय मागितला. त्यांनी संविधानाचं उल्लंघन करणाऱ्यांना निवडणुका जाहीर करा असं सांगितलं होतं. यापुढं आम्ही गप्प बसणार नाही.'

हेही वाचा: Congress : धीरेंद्र चमत्कारिक असतील तर, त्यांनी 'हे' काम करुन दाखवावंच; काँग्रेस खासदाराचं ओपन चॅलेंज

निवडणूक आयोगाला धमकावल्याचा आरोप

फवाद चौधरींसह पीटीआय नेत्यांवर निवडणूक आयोगाला धमकावल्याचा आरोप आहे. पाकिस्तानचे विद्यमान सरकार इम्रान खान यांना अटक करण्याचा कट रचत असल्याचा आरोपही फवाद चौधरी यांनी केला आहे.

हेही वाचा: Shri Ram Sene : सत्तेतल्या भाजपला बसणार दणका; श्रीराम सेनेचे प्रमुख अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार

अजामीनपात्र वॉरंट जारी

निवडणूक आयोगानं पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान, फवाद चौधरी आणि असद उमर यांच्याविरुद्ध अवमान प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. पीटीआयच्या नेत्यांनी आयोगासमोर हजर राहण्यापासून सूट मागितली होती, परंतु आयोगानं ही मागणी फेटाळून लावली आणि 50,000 रुपयांच्या जामीन बॉण्डवर अटक वॉरंट जारी केलं.