माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नवे निवासस्थान समुद्रकिनारी; 1100 कोटी डॉलर्स किंमत

टीम ई सकाळ
Thursday, 21 January 2021

जो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्याआधी ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडलं. तसंच ट्रम्प बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हते.

वॉशिंग्टन - जो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्याआधी ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडलं. तसंच ट्रम्प बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हते. व्हाइट हाउसमधून बाहेर पडल्यानंतर आता ट्रम्प हे मार ए लागो इस्टेट इथं राहणार आहेत. ट्रम्प आणि मेलानिया हे दोघेही व्हाइट हाउसमधून मरिन वन या हेलिकॉप्टरमधून जॉइंट बेस अँड्र्युजकडे निघून गेले. एअर फोर्स वनने ते मार ए लागो इस्टेट इथं जाणार आहेत. 

राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी मार ए लागो इथं बराच काळ घालवला आहे. त्याला विंटर व्हाइट हाउस असंही म्हटलं आहे. त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये कायदेशीरपणे ट्रम्प टॉवर ऐवजी मार ए लागो हे निवासस्थान असल्याचं नोंद केलं आहे. 

हे वाचा - बायडेन यांचा शपथविधी ठरला ऐतिहासिक; वाचा सोहळ्याची खास वैशिष्ट्ये

डोनाल्ड ट्रम्प यांनी 1985 मध्ये एक कोटी डॉलरमध्ये या अलिशान घराची खरेदी केली होती. त्यानंतर एक खासगी क्लब म्हणून सुरू करण्यात आला होता. गेल्या चार वर्षांच्या काळात ट्र्म्प हिवाळ्यामध्ये तिथेच रहायला जात होते. 20 एकर परिसरात असलेल्या या अलिशान घरामध्ये 128 खोल्या आहेत.

इस्टेटच्या समोर अटलांटिक महासागराचा किनारा असून क्लबचे सदस्यत्व खरेदी करणाऱ्यांना तिथे प्रवेश दिला जातो. म्यूरिश मेडिटेरेनियन शैलीवरून उभारण्यात आलेली ही अलिशान वास्तू 1927 मध्ये मार्जोरी मेर्रीवेर पोस्टने बांधली होती. यामध्ये 128 खोल्या आहेत. 

हे वाचा - अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाचा इतिहास; कुणी किती शब्दांत आणि मिनिटांत भाषण आटोपलं?

जवळपास 20 हजार वर्ग फूट बॉलरूम यामध्ये आहेत. पाच क्ले टेनिस कोर्ट, एक वॉटरफ्रंट पूलसुद्धा यामध्ये आहे. ट्रम्प यांनी या इस्टेटचा एक भाग स्वत:कडे ठेवला आहे. यामध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही. फ्लोरीडातील सर्वात मोठी वास्तू म्हणून या निवासस्थानाला ओळखलं जातं. फोर्ब्सने याची किंमत जवळपास 1100 कोटी डॉलर्स असल्याचं म्हटलं होतं. 
अमेरिका अमेरिका
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former president of america donald trump new address