Pervez Musharraf death: दिल्लीत जन्मला होता कारगिल युद्धाचा विलन

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं
Pervez Musharraf death
Pervez Musharraf deathesakal

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. दुबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत झाला होता जन्म

11 ऑग्सट 1943 मध्ये परवेज मुशर्रफ यांचा जन्म दरियागंज दिल्ली येथे झाला होता. 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी पाकिस्तान सरकारसाठी काम करण्यास सुरुवात केली आणि परराष्ट्र मंत्रालयासोबत जोडले गेले.

Pervez Musharraf passes away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन!

परवेझ मुशर्रफ यांचे कुटुंब फाळणीपूर्वी भारतात खूप समृद्ध होते. त्यांचे आजोबा कर वसूल करणारे अधिकारी होते. त्यांचे वडीलही ब्रिटिश राजवटीत मोठे अधिकारी होते. मुशर्रफ यांच्या आईने अलीगड मुस्लिम विद्यापीठात शिक्षण घेतले. जुन्या दिल्लीत मुशर्रफ कुटुंबाचा मोठा बंगला होती. मुशर्रफ त्यांच्या जन्मानंतर चार वर्षांपर्यंत ते येथेच राहिले.

परवेझ मुशर्रफ यांच्या आई बेगम जरीन मुशर्रफ यांनी 2005 मध्ये भारत भेटीदरम्यान लखनौ, दिल्ली आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला भेट दिली. जरीन 1940 मध्ये येथे शिकत होत्या.

1947 मध्ये फाळणीच्या वेळी, त्यांचे कुटुंब 4 वर्षीय परवेझ मुशर्रफ यांच्यासोबत पाकिस्तानातील कराची येथे गेले. ब्रिटिश सरकारसाठी काम करणारे मुशर्रफ यांचे वडील पाकिस्तानच्या नव्या सरकारमध्ये अधिकारी झाले. ते पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयात काम करू लागले.

कारगिलच्या युद्धात हार मानावी लागली

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी लष्करात कनिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले. 1965च्या युद्धात ते भारताविरुद्ध लढले. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. असे असतानाही मुशर्रफ यांना त्यांच्या शौर्याबद्दल पाकिस्तान सरकारने पदक दिले होते.

मुशर्रफ यांनी 1971च्या युद्धातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे लक्षात घेऊन सरकारने त्यांना अनेकवेळा बढती दिली. 1998 मध्ये परवेझ मुशर्रफ जनरल झाले. भारताविरुद्ध कारगिलचा कट त्यांनीच रचला. पण हा कट भारतीय वीरांनी साहसाने उधळून लावला.

जनरल मुशर्रफ यांनी त्यांच्या ‘इन द लाइन ऑफ फायर – अ मेमोयर’ या चरित्रात लिहिले आहे की, त्यांनी कारगिल काबीज करण्याची शपथ घेतली होती. मात्र नवाझ शरीफ यांच्यामुळे त्यांना हे करता आले नाही.

फाशीची शिक्षा

परवेज मुशर्रफ यांना पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानाच्या इतिहासात प्रथमच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने मुशर्रफ यांना शिक्षा सुनावली होती.

परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि राज्यघटना निलंबित केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 31 मार्च 2014 मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.

मात्र, नंतर लाहोर कोर्टाने मुशर्रफ यांना सुनावलेली फाशीची शिक्षा असंवैधानिक असल्याचं म्हटलं आणि ही शिक्षा रद्द करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com