अमेरिका-कॅनडा सीमेवरील 'त्या' भारतीयांचा मृत्यू मानवी तस्करीतून?

मृत्यू झालेले कुटुंब गुजरातची राजधानी गांधीनगरमधील दिलगुचा गावाचे रहिवासी होते.
Death Family
Death Family

न्यूयॉर्क : अमेरिका-कॅनडा सीमेजवळ मृतावस्थेत सापडलेल्या 4 भारतीय नागरिकांच्या कुटुंबाची ओळख पटली असून, या चौघांचा मृत्यू मानवी तस्करीतून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हे कुटुंब काही काळ देशात होते आणि त्यांना कारमधून सीमेवर नेण्यात आले होते, अशी माहिती कॅनडातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृत्यू झालेले कुटुंब गुजरातची राजधानी गांधीनगरमधील दिलगुचा गावाचे रहिवासी होते.

Death Family
कॅनडा-अमेरिका सीमेवर चौघांचा गोठून मृत्यू, भारतातील या गावाची चिंता वाढली

भारतीय वाणिज्य दूतावास कुटुंबीयांच्या संपर्कात

रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (आरसीएमपी) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मॅनिटोबाच्या मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने या नागरिकांचा सर्दीमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावास मृत व्यक्तींच्या कुटुंबाशी संपर्कात असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Death Family
Budget 2022 : 1950 मध्ये चार पैसे आयकरावर चालत होते सरकार

घटनास्थळावर आढळून आले नाही कोणतेही वाहन

या घटनेनंतर, घटनास्थळावरून कोणतेही वाहन सापडले नसून, या कुटुंबाला कुणीतरी सीमेवर आणले आणि नंतर येथेच सोडून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी सादर केलेल्या निवेदनातून व्यक्त केला आहे. दरम्यान, या सर्व घटनेवरून हे प्रकरण मानवी तक्सरीचे असल्याची शक्याता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरणावर टोरंटोमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि भारतीय वाणिज्य दूतावास लक्ष ठेवून असून सर्व पैलू तपासले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com