esakal | फ्रान्सच्या 96 टक्के शाळांमध्ये कंडोम व्हेंडिंग मशीन; कारण माहितीय का?
sakal

बोलून बातमी शोधा

condome vending machine

फ्रान्समधील 96 टक्के माध्यमिक शाळांमध्ये कंडोम व्हेंडिंग मशिन्स असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. यानंतर अनेकांच्या भूवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.

फ्रान्सच्या 96 टक्के शाळांमध्ये कंडोम व्हेंडिंग मशीन; कारण माहितीय का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पॅरिस - फ्रान्समधील 96 टक्के माध्यमिक शाळांमध्ये कंडोम व्हेंडिंग मशिन्स असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. यानंतर अनेकांच्या भूवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. खरंतर फ्रान्सने सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी आणि कमी वयात प्रेग्नन्सीचा धोका कमी करण्यासाठी असं पाऊल उचललं आहे. फ्रान्सच्या शाळांमध्ये अशी व्हेंडिंग मशिन्स लावण्यात आली आहेत ज्यामधून कंडोम मिळतात. 

फ्रान्सने घेतलेला हा निर्णय आताचा नव्हे तर जवळपास 30 वर्षांपूर्वी घेतला होता. 1992 मध्ये घेतलेल्या या क्रांतीकारी निर्णयानंतर शाळा प्रशासनासह समाजातील काही घटकांकडून विरोधही करण्यात आला होता. मात्र लोकांनी लवकरच या निर्णयाचं स्वागतही केलं होतं. फ्रान्समध्ये गेल्या वर्षी शिक्षण मंत्रालयाने एक सर्वे केला होता. त्यानुसार राज्याकडून अनुदान मिळणाऱ्या जवळपास 96 टक्के माध्यमिक शाळा, पब्लिक स्कूल आणि खासगी शाळांमध्ये कंडोम व्हेंडिंग मशीन लावलं आहे. 

स्टॅटिस्टाच्या एका रिपोर्टमधून याबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यात 2019 मध्ये एका राज्यात सर्वाधिक कंडोमची विक्री झाली होती. फ्रान्समधील इले डे फ्रान्स इथं तब्बल 26 मिलियन कंडोम विकण्यात आले होते. त्याशिवाय ऑवरगने रॉन अल्पसमध्ये जवळपास 14.6 मिलियन कंडोम विकण्यात आल्याची माहिती रिपोर्टमध्ये दिली होती. 

हे वाचा - फ्रान्समध्ये तीन आठवड्यांचा पुन्हा लॉकडाऊन; तिसऱ्या लाटेचा हाहाकार

तरुण पिढीला सुरक्षित लैंगिक संबंधांची माहिती व्हावी आणि त्यात अडथळा असलेल्या रुढी पंरपरांना छेद देणारा फ्रान्स हा एकमेव देश नाही. याआधी अमेरिकेनेसुद्धा यादृष्टीने पावले उचलली होती. पब्लिक स्कूलमध्ये कंडोमचं वाटप करण्यात आलं होतं. 

loading image