
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच अनेक मोठे धोरणात्मक निर्णय घेतले. यामुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. युरोपातील अनेक देश अमेरिकेच्या बदलत्या धोरणांमुळे त्रस्त आहेत. अशातच आता फ्रान्सने अमेरिकन प्रशासनाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी परत नेण्याची धमकी दिलीय.