
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सध्या अडचणीत सापडल्या आहेत. मेलोनी यांच्या सरकारवर एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला सोडल्याचा आणि जेटचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. इटलीमध्ये सरकारविरोधी चौकशी सुरू झाली आहे. जर चौकशीत सरकारविरोधात पुरावे आढळले तर येत्या काळात मेलोनी यांची सत्ता आणि खुर्ची धोक्यात येऊ शकते.