France Inflation Protest
esakal
फ्रान्समध्ये महागाई आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पॅरिससह अनेक शहरांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले असून, पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याची माहिती आहे. याचदरम्यान, लिमोज शहरातील ऐतिहासिक टाउन हॉलला आग लागली. तब्बल १४३ वर्षांचा इतिहास असलेल्या या वास्तूचं आगीत मोठं नुकसान झालं आहे.