फ्रान्सला मिळाली दुसरी महिला पंतप्रधान; एलिझाबेथ बोर्न यांची नियुक्ती

एलिझाबेझ बोर्न या कामगार मंत्री म्हणून कार्यरत होत्या.
Elizabeth Borne
Elizabeth BorneSakal

एलिझाबेथ बोर्न यांच्या रुपात फ्रान्सला दुसरी महिला पंतप्रधान मिळाली आहे. जीन कॅस्टेक्स यांनी राजीनामा दिल्यानंतर एलिझाबेझ बोर्न यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. बोर्न या कामगार मंत्री म्हणून मागील सरकारमध्ये कार्यरत होत्या.

बोर्न यांच्या नियुक्तीनंतर राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूएल मॅक्रॉन म्हणाले की, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, रोजगार, लोकशाहीचं पुनरुज्जीवन या सगळ्यांना सोबत घेऊन नवं फ्रेंच सरकार जनतेसाठी अथक परिश्रम करेल. येत्या काही दिवसांमध्ये बोर्न आणि मॅक्रॉन हे दोघे मंत्रिमंडळ विस्तार करतील.

Elizabeth Borne
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वीकारला PM कॅस्टेक्स यांचा राजीनामा

कोण आहेत एलिझाबेथ बोर्न?

एलिझाबेथ बोर्न या फ्रान्सच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. पहिल्या महिला पंतप्रधान एडीथ क्रेसन या होत्या, ज्यांनी १९९१ ते १९९२ पर्यंत पदभार सांभाळला. बोर्न या २०२० पासून कामगार मंत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी केलेल्या बदलांमुळे त्यांना डाव्यांकडून तसंच कामगार संघटनांकडून मोठ्या टीकेचा सामना करावा लागला.

२०१८ मध्ये वाहतूक मंत्री म्हणून काम करत असताना बोर्न यांना एसएनसीएफ रेल्वे कंपनीकडून करण्यात आलेल्या मोठ्या संपाचा सामना करावा लागला. रेल्वे नेटवर्कमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करणं आणि नव्याने नियुक्त झालेल्या लोकांना कामावरून काढणं, आणि त्यांना मिळणारे फायदे काढून घेणं, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. मात्र त्यांनी हे विधेयक अखेर मंजूर करून घेतलंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com