जगभरात 'इस्लाम' धोक्यात; फ्रान्स अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम समाजात संताप

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रोन यांनी फ्रान्सच्या धर्मनिरपेक्ष मुल्यांच्या संरक्षणासाठी एक योजना आखणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पॅरिस- राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रोन यांनी फ्रान्सच्या धर्मनिरपेक्ष मुल्यांच्या संरक्षणासाठी एक योजना आखणार असल्याचं जाहीर केलं आहे. इस्लामिक कट्टरतावाद आणि फुटिरतावादापासून देशाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जगभरात इस्लाम संकटात असल्याचंही ते म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाकडून त्यांच्यावर टीका होत आहे. पुढील वर्षी यासंबंधात एक कायदा केला जाणार असल्याचं मॅक्रोन म्हणाले आहेत.

इस्लाम असा धर्म आहे, जो जगामध्ये धोक्यात आला आहे. हे सर्व फ्रान्समध्ये घडतय असं नाही, तर संपूर्ण जगात असं पाहायला मिळत आहे. 1905 साली चर्च आणि राज्य यांना वेगवेगळे करणारा कायदा आणण्यात आला, त्यात सुधारणा करुन देशाला कट्टरतावादापासून दूर ठेवले जाईल, असं मॅक्रोन म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाकडून टीका करण्यात येत आहे. मॅक्रोन आधी कट्टर इस्लामच्या विरोधात होते, आता ते इस्लामच्या विरोधात आहेत, असं प्रतिक्रिया उमटत आहे. 

मुलांच्या मदतीला सोनू सूद आला धावून ; ऑनलाइन अभ्यासासाठी बसवला मोबाईल टॉवर

सोशल मीडियावर मुस्लिम समाजाने मॅक्रोन यांना लक्ष्य केले आहे. फ्रान्सचे मुस्लिम सामाजिक कार्यकर्ता यासर लाऊती यांनी ट्विट करुन म्हटलंय की, मुस्लिमांवर दबाव आणणे चुकीचे आहे. महामारीच्या काळात होम-स्कूलिंगवर लावण्यात आलेल्या कडक नियमांमुळे मुस्लिम विद्यार्थ्यांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. 

नव्या कायद्यात असणार कडक नियम

कायद्यानुसार होम-स्कुलिंगवर कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत, जेणेकरुन राष्ट्रीय अभ्यासक्रमाव्यतरिक्त शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अॅडमिशन होणार नाही. इस्लामिक फुटिरतावादापासून लढणे आवश्यक असल्याचे मॅक्रोन म्हणाले आहेत. काही विचारधारांचा असा दावा आहे की त्यांचे कायदे देशापेक्षा उच्च आहेत, अशा लोकांपासून आपल्या देशाला धोका असल्याचे मॅक्रोन म्हणाले आहेत.

सात महिन्यानंतर पुन्हा सुरु होणार मक्का; 'उम्राह' यात्रेसाठी मशीद खुली

फ्रान्समध्ये अरबी भाषा शिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामॉलोजीची स्थापना केली जाईल, असं मॅक्रोन यांनी स्पष्ट केलं. मात्र, ट्रेनिंगसाठी परदेशातील मौलानांना बोलावले जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आमची लढाई इस्लामिक कट्टरवाद आणि फुटीरतावादाशी आहे, इस्लामविरोधात नाही, असं फ्रान्सच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. 

(edited by- kartik pujari) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: france president Emmanuel Macron said Islam in crises